मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger stocks : शाॅर्ट टर्ममध्ये हा IT स्टाॅक्स देईल जबरदस्त परतावा, तज्ज्ञ म्हणतात खरेदी करा !

Multibagger stocks : शाॅर्ट टर्ममध्ये हा IT स्टाॅक्स देईल जबरदस्त परतावा, तज्ज्ञ म्हणतात खरेदी करा !

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 16, 2023 04:24 PM IST

Multibagger stocks : अंदाजे ४४ तज्ज्ञांपैकी १७ जणांनी आयटी क्षेत्रातील जबरदस्त परतावा देणाऱा हा स्टाॅक्स तात्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. विशेषकरुन, ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधानपदी बसल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात हा स्टाॅक राॅकेटसारखा पळू लागलाय.

Multibagger stocks HT
Multibagger stocks HT

Buy,Sell or Hold Infosys : अंदाजे ४४ तज्ज्ञांपैकी १७ जणांनी आयटी क्षेत्रातील जबरदस्त परतावा देणाऱा हा स्टाॅक्स तात्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. इतर १९ जणांनीही या खरेदीचा कौल दिला असून उर्वरित ३ जणांनीच विक्रीचा सल्ला दिला आहे. विशेषकरुन, ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधानपदी बसल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात हा स्टाॅक राॅकेटसारखा पळू लागलाय.

जर तुम्हाला चालू आठवड्यात शेअर बाजारातून नफा कमावण्याचा इरादा असेल तर कमी धोका असलेल्या इन्फोसिसच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करु शकतात. या आयटी क्षेत्रातील कंपनीवर शेअर तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. इन्फोसिसचे टार्गेट प्राईस १५६५ रुपये आणि स्टाॅप लाॅस अंदाजे १४५४ रुपये ठेवण्यात आला आहे.

एकूण ४४ तज्ज्ञांपैकी अंदाजे १७ जणांनी इन्फोसिसचे शेअर्स त्वरित खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे तर १९ जणांनीही हा स्टाॅक बुलिश असल्याचे सांगितले आहे. केवळ तीन जणांनीच हा शेअर विकण्याचा तर ५ जणांनी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवारच्या शेवटच्या सत्रात तो अंदाजे १.५८ टक्के वाढीसह अंदाजे १५०४ रुपयांवर बंद झाला. या शेअर्सचा ५२ आठवड्यातील उच्चांक अंदाजे १९५३.९० रुपये आणि निचांकी अंदाजे १३५५ रुपये आहे.

तिमाही निकालही चांगले

इन्फोसिसला चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर २०२२च्या तिमाहीत निव्वळ नफा १३.४ टक्के वाढून ९५८६ कोटी रुपये झाला आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात उत्पन्नात १६ ते १६.५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तिसऱ्या तिमाहीत इन्फोसिसला निव्वळ नफा ५८०९ कोटी रुपये होता. कंपनीचे उत्पन्न, कामगिरी आणि नफा हा अपेक्षेपेक्षा चांगला असल्याने तज्ज्ञांनी इन्फोसिसच्या शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग