Stocks To Buy : आजच्या दिवशी हे १० स्टॉक्स देऊ शकतात तगडा नफा; तज्ज्ञांना विश्वास
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks To Buy : आजच्या दिवशी हे १० स्टॉक्स देऊ शकतात तगडा नफा; तज्ज्ञांना विश्वास

Stocks To Buy : आजच्या दिवशी हे १० स्टॉक्स देऊ शकतात तगडा नफा; तज्ज्ञांना विश्वास

HT Marathi Desk HT Marathi
Dec 16, 2024 10:21 AM IST

Stocks To Buy Today : शेअर खरेदी ही स्वत:च्या अभ्यासानुसार व क्षमतेनुसार करणं कधीही चांगलं. या अभ्यासात एक्सपर्ट्सची शिफारस अनेकदा महत्त्वाची ठरते. पाहूया आज काय आहे मार्केट तज्ज्ञांचा सल्ला?

Stocks To Buy : आजच्या दिवशी हे १० स्टॉक्स देऊ शकतात तगडा नफा; तज्ज्ञांना विश्वास
Stocks To Buy : आजच्या दिवशी हे १० स्टॉक्स देऊ शकतात तगडा नफा; तज्ज्ञांना विश्वास

Stock Market News Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी खरेदी करण्यासाठी मार्केट एक्सपर्ट्सनी वेगवेगळ्या क्षेत्रातील दहा शेअर्सची शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे सुमित बागरिया यांनी क्रिसिल, एरीज अ‍ॅग्रो, पीडीएस, एडीएफ फूड्स आणि ल्युमॅक्स ऑटोटेक्नॉलॉजीज हे ५ शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. प्रभुदास लिलाधरच्या टेक्निकल रिसर्चच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी टाटा मोटर्स लिमिटेड, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि स्टेट बँक तर, मार्केटस्मिथ इंडियानेही दोन शेअर घेण्याची सूचना केली आहे.

सुमित बागरियाचा यांचा सल्ला

 

क्रिसिल : क्रिसिल ५८९० रुपयांना खरेदी करून लक्ष्य ६२२२ रुपये ठेवा. यासोबतच स्टॉपलॉस ५६५० रुपये ठेवा.

आरिज अ‍ॅग्रो : आरिज अ‍ॅग्रो ३८७.९० रुपयांना खरेदी करा, लक्ष्य ४१५ रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ३७५ रुपये ठेवा.

पीडीएस: पीडीएस ६११.०५ रुपयांना खरेदी करून लक्ष्य ६५० रुपये आणि स्टॉप लॉस ५८८ रुपये ठेवा.

एडीएफ फूड्स : हा शेअर ३४३.५५ रुपयांना खरेदी करून टार्गेट ३६५ रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ३३० रुपये ठेवा.

लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज : हा शेअर ६०६ रुपयांना खरेदी करावा, टार्गेट ६५० रुपये ठेवावे आणि स्टॉपलॉस ५८५ रुपये ठेवावा.

मार्केटस्मिथ यांचे शेअर्स

 

मणप्पुरम फायनान्स : हा शेअर १ ते २ महिन्यांसाठी १८० ते १८४ च्या दरम्यान खरेदी करा. टार्गेट १९९ रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस १७१ ठेवायला विसरू नका.

जेएनके इंडिया लिमिटेड : ३ ते ४ महिन्यांसाठी हा शेअर ६३०-६४५ रुपयांपर्यंत खरेदी करा. टार्गेट ७५० रुपये आणि स्टॉपलॉस ५८८ रुपये ठेवा.

वैशाली पारेख यांची शिफारस

 

टाटा मोटर्स ७९१ रुपयांना विकत घ्या, टार्गेट ८२० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ७७० रुपये ठेवा.

एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड : ६३१ रुपयांत खरेदी करा, ६६० रुपये टार्गेट ठेवा आणि ६२०.२० रुपये स्टॉप लॉस ठेवा.

स्टेट बँक ऑफ इंडिया लिमिटेड : एसबीआयवर ८५९ रुपये खरेदीची शिफारस केली असून, ८८० रुपयांचं टार्गेट ठेवून ८४५ रुपये स्टॉपलॉस ठेवा.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner