Stocks To Buy : इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आज हे ४ स्वस्त शेअर्स देऊ शकतात मोठा नफा, तुम्हीही विचार करा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks To Buy : इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आज हे ४ स्वस्त शेअर्स देऊ शकतात मोठा नफा, तुम्हीही विचार करा!

Stocks To Buy : इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आज हे ४ स्वस्त शेअर्स देऊ शकतात मोठा नफा, तुम्हीही विचार करा!

Published Feb 12, 2025 09:02 AM IST

Intraday Stocks To Buy Today : सध्याच्या प्रचंड अस्थिर आणि गडगडणाऱ्या शेअर बाजारात इंट्राडे ट्रेडिंगसाठी तज्ञांनी स्वस्तातले ४ शेअर्स सुचवले आहेत.

Stocks To Buy : इंट्राडे ट्रेडिंगसाठी आज या ४ स्वस्त शेअर्सवर तज्ञ आशावादी, तुम्हीही विचार करा!
Stocks To Buy : इंट्राडे ट्रेडिंगसाठी आज या ४ स्वस्त शेअर्सवर तज्ञ आशावादी, तुम्हीही विचार करा!

Shares To Buy : मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्यानं घसरण सुरू आहे. मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड झाली. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारही सावध झाले आहेत. अशातच तज्ञांनी १०० रुपयांपेक्षा कमी काही शेअर्स सुचवले आहेत.

‘चॉइस ब्रोकिंग’चे कार्यकारी संचालक सुमीत बागरिया, एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीज रिसर्च हेड अंशुल जैन यांनी आज १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे पीएनबी, आयएफसीआय, मेडिको रेमेडीज आणि श्रीराम न्यूजप्रिंट या शेअर्सची शिफारस केली आहे.

सुमित बागरिया यांचे शेअर्स

मेडिको रेमेडीज

मेडिको रेमेडीज हा शेअर ६९.९३ रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस ७५ रुपये ठेवून स्टॉपलॉस ६७.५० रुपये ठेवा.

श्रीराम न्यूजप्रिंट

या शेअरवर 'बाय' रेटिंग असून त्याची टार्गेट प्राइस २१.८० रुपये आहे. स्टॉपलॉस १९.५० रुपये आहे.

सुगंधा सचदेवा यांचे शेअर्स

आयएफसीआय

आयएफसीआय हा शेअर ४९.३० रुपयांना काढून टाकावा. यात ४७ रुपयांचे टार्गेट आणि ५०.५० रुपयांचा स्टॉपलॉस आहे.

अंशुल जैन यांचा इंट्राडे स्टॉक

पीएनबी

पीएनबी म्हणजेच पंजाब नॅशनल बँक ९५ रुपयांना खरेदी करा. टार्गेट १०० रुपयांवर ठेवा आणि स्टॉप लॉस ९३ रुपयांवर ठेवा.

पाच दिवसांत १७ लाख कोटी बुडाले!

गेल्या पाच दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं १६.९७ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. या ५ दिवसांत परकीय संस्थात्मक गुंतवणुकीचा आटता ओघ आणि अमेरिकेच्या नव्या आयात शुल्कांमुळं व्यापारयुद्धाच्या भीतीनं बाजार नकारात्मक क्षेत्रात अडकला आहे. गेल्या पाच दिवसांत बीएसई निर्देशांक २,२९०.२१ अंकांनी म्हणजेच २.९१ टक्क्यांनी घसरला आहे, तर निफ्टी ६६७.४५ अंकांनी म्हणजेच २.८१ टक्क्यांनी घसरला आहे. तात्पुरत्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारी ४,४८६.४१ कोटी रुपये काढले.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Ganesh Pandurang Kadam

TwittereMail

गणेश कदम २०२२ पासून हिंदुस्तान टाइम्स- मराठीमध्ये सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत आहे. गणेश गेली २० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून यापूर्वी लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, सामना या दैनिकांमध्ये काम केले आहे. राजकीय वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक राजकीय सभा, आंदोलने व विधीमंडळाची अधिवेशने कव्हर केली आहेत. २०१२ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारिता सुरू केली. गणेशला राजकारण, अर्थकारणाबरोबरच साहित्य व संगीत विषयक घडामोडींची विशेष आवड आहे.

Whats_app_banner