stocks to buy : बक्कळ कमाई करायची असेल तर या आठवड्यात घ्या हे चार शेअर, तज्ज्ञांची शिफारस
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stocks to buy : बक्कळ कमाई करायची असेल तर या आठवड्यात घ्या हे चार शेअर, तज्ज्ञांची शिफारस

stocks to buy : बक्कळ कमाई करायची असेल तर या आठवड्यात घ्या हे चार शेअर, तज्ज्ञांची शिफारस

Updated Jul 08, 2024 10:29 AM IST

stocks to buy this week : आजपासून सुरू होणारा नवा आठवडा शेअर बाजारासाठी खूपच घडामोडींचा असेल. या आठवड्यात कोणते शेअर तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकतात? वाचा तज्ज्ञांच्या शिफारशी

stocks to buy : बक्कळ कमाई करायची असेल तर या आठवड्यात घ्या हे चार शेअर, तज्ज्ञांची शिफारस
stocks to buy : बक्कळ कमाई करायची असेल तर या आठवड्यात घ्या हे चार शेअर, तज्ज्ञांची शिफारस

stocks to buy this week : शेअर बाजाराच्या दृष्टीनं चालू महिना बऱ्याच घडामोडींंचा ठरणार आहे. टीसीएस, एचसीएस यांसह इतर अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत आहे. तसंच, २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यात उद्योगजगताना प्रोत्साहन देणाऱ्या घोषणांची शक्यता आहे. देशभरात पावसानंही आता जोर पकडला आहे. हे सगळे घटक लक्षात ठेवून नव्या आठवड्यात बाजारावर नजर ठेवावी लागणार आहे.

हे चार शेअर्स या आठवड्यात देऊ शकतात चांगला नफा

शेअर मार्केट तज्ज्ञ कविंद्र सचान यांनी या आठवड्यात चार शेअर्सवर नजर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर मजबूत नफा मिळवून देऊ शकतात, असं त्याचं म्हणणं आहे. यात टाटा पॉवर, आयओसी, आयआरसीटीसी आणि नुपूर रिसायकलर यांचा समावेश आहे. कोणत्या किंमतीला खरेदी करायची, स्टॉप लॉस कुठे सेट करायचा आणि टार्गेट काय आहे ते समजून घेऊया…

नुपूर रिसायकलर्स

कोणत्या किंमतीला खरेदी करायचा : ९० ते ९४.५

कितीपर्यंत वाढू शकतो : १०६ ते १२५ रुपये

स्टॉप लॉस : ८५ रुपये

५२ आठवड्यांचा उच्चांक - १०६ रुपये

५२ आठवड्यांचा नीचांक - ५७ रुपये

आयआरसीटीसी (IRCTC)

कोणत्या किंमतीला खरेदी करायचा : १०२२-१०२४

लक्ष्य किंमत : ११०० ते ११९५ रुपये

स्टॉप लॉस : १०१५ रुपये

पीई: ७१

५२ आठवड्यांचा उच्चांक : ११४८ रुपये

५२ आठवड्यांचा नीचांक : ६१४ रुपये

टाटा पॉवर (Tata Power)

कोणत्या किंमतीला खरेदी कराल -  ४३४-४३९

टार्गेट प्राइस : ४६० ते ४७६ रुपये

स्टॉप लॉस: ४३० रुपये

५२ आठवड्यांचा उच्चांक : ४६४ रुपये

५२ आठवड्यांचा नीचांक : २१७ रुपये

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC)

कोणत्या किंमतीला खरेदी कराल : १६८ रुपयांच्या वर

टार्गेट प्राइस :१७५ ते १९६ रुपये

स्टॉप लॉस: १६८ रुपये

५२ आठवड्यांचा उच्चांक : ८५ रुपये

५२ आठवड्यांचा नीचांक : १९७ रुपये

 

(डिस्क्लेमर : या लेखातील तज्ञांच्या शिफारशी, सूचना आणि मते ही त्यांची स्वतःची आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठीची नाहीत. ही केवळ शेअर्सच्या कामगिरीची माहिती आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner