One Point On Solutions Share Price : वन पॉईंट वन सोल्युशन्स या चिमुकल्या कंपनीचे शेअर्स सातत्यानं चांगला परतावा देत आहेत. आज देखील या शेअरमध्ये कमालीचे चढउतार होत असून दुपारी २ वाजता हा शेअर एनएसईवर ७४.६५ रुपयांवर ट्रेड करत आहे. गेल्या चार वर्षांत हा शेअर तब्बल ४,३२८ टक्क्यांनी वधारला आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये या शेअरची किंमत १.७५ रुपये होती. ऑगस्ट २०२१ मध्ये हा शेअर ५.०८ रुपयांवर व्यवहार करत होता आणि तेव्हापासून तो १,४२५.५ टक्क्यांनी वधारला आहे. यामुळं दीर्घ मुदतीत जबरदस्त परतावा मिळाला आहे. अल्प काळातही वन पॉईंट वन सोल्युशन्सच्या शेअरनं गुंतवणूकदारांना ६६ टक्के इतका परतावा दिला आहे. या वर्षांतील आठ पैकी तीन महिन्यांत तोटा सहन करावा लागला असला तरी या शेअरमध्ये १६१ टक्के वाढ झाली आहे. २०२४ मध्ये हा शेअर आतापर्यंत ५३ टक्क्यांनी वधारला आहे.
या शेअरसाठी ऑगस्ट महिना मजबूत राहिला आहे. जुलैमध्ये १६.७ टक्के आणि जूनमध्ये १०.४ टक्के वाढ होऊन त्यात ७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. मे महिन्यात २.४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली असली तरी एप्रिलमध्ये हा शेअर ४.७ टक्क्यांनी वधारला होता. यापूर्वी फेब्रुवारीत ३ टक्क्यांनी घसरल्यानंतर मार्चमध्ये १३ टक्क्यांनी घसरण झाली होती. वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत शेअरमध्ये २४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आज, २७ ऑगस्ट २०२४ रोजी इंट्राडे व्यवहारात या शेअरनं ७७.५ रुपयांचा उच्चांक गाठला. सप्टेंबर २०२३ मधील ५२ आठवड्यांच्या नीचांकी २७.८५ रुपयांच्या पातळीच्या तुलनेत तो १७८ टक्क्यांनी वधारला आहे.
वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेड कंपनीची स्थापना २००८ मध्ये झाली होती. नवी मुंबईत मुख्यालय असलेली ही कंपनी भारतात कस्टमर लाइफ सायकल मॅनेजमेंट, बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट आणि टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस पुरवण्यात आघाडीवर आहे. कंपनी ग्राहक सेवा, कर्ज व्यवस्थापन, विक्री, लीड जनरेशन, बॅक-ऑफिस सपोर्ट आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट सेवा पुरवते. तसंच, वर्कफ्लो मॅनेजमेंट, स्पीच अॅनालिटिक्स आणि आयटी इन्फ्रा सर्व्हिसेस सारखे बिझनेस सोल्यूशन्स देखील देते. बँकिंग, टेलिकॉम, इन्शुरन्स आणि ई-कॉमर्स सारख्या क्षेत्रांमध्ये सेवा पुरवणारी वन पॉईंट वन सोल्यूशन्स ग्राहकांना केवायसी, फ्रॉड व्हेरिफिकेशन आणि टेक्निकल सपोर्ट डेस्क ऑपरेशन्ससह सेवा पुरवते.
जून तिमाहीत वन पॉईंट वन सोल्युशन्सला २२.३७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. गेल्या वर्षी याच कालावधीतील ४.३ कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम अनेक पटींनी अधिक आहे. कंपनीच्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे.