देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर लोकांच्या मनात हाच प्रश्न उपस्थित होत आहे की, त्यांच्या मृत्यूनंतर आता १० हजार कोटींच्या संपत्तीचा मालक कोण होणार? रतन टाटा यांचे मृत्यूपत्र आता समोर आले आहे. रतन टाटा यांनी आपल्याशी संबंधित अनेक लोकांना आपल्या संपत्तीत भागीदार बनवले आहे. रतन टाटा यांनी आपल्या संपत्तीत भाऊ जिमी टाटा, सावत्र बहीण शिरीन आणि डिएना जीजीभॉय, हाउस स्टाफशी संबंधित लोकांना भागीदार बनवले आहे. त्याचबरोबर आपल्या फाउंडेशनचाही उल्लेख केला आहे.
रतन टाटा यांनी आपला ड्रायव्हर बटलर आणि आपल्या श्वानासह अनेकांनी संपत्ती दिली आहे. मात्र आपले सावत्र भाऊ नोएल टाटाचा साधा उल्लेखही केलेला नाही. यामुळे रतन टाटा व त्यांचे भाऊ नोएल टाटा यांच्या नात्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. म्हटले जात आहे की, दोन भावांमध्ये चांगले संबंध नव्हते.
रतन टाटा यांच्या निधनानंतर आता त्यांचे इच्छापत्र समोर आले आहे. यामध्ये रतन टाटा यांचे दीर्घकाळ सहकारी असलेले शांतनू नायडू यांचेही नाव आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. रतन टाटा यांनी शांतनू नायडू यांच्या गुडफेलोज या कंपनीतील आपला हिस्सा सोडला आहे. याशिवाय नायडू यांचा परदेशी शिक्षणाचा खर्चही उचलला होता. तो आता माफ केला आहे.
रतन टाटा यांच्या १० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीत अलिबागमधील दोन हजार चौरस फुटांच्या बंगल्याचा समावेश आहे. जुहू रोडवरही दोन मजली घर आहे. याशिवाय ३५० कोटींहून अधिकची एफडी आहे. रतन टाटा यांची टाटा सन्समध्ये ०.८३ टक्के हिस्सेदारी आहे. टाटा समूहाची मालकी टाटा सन्सकडे आहे . जी रतन टाटा एंडोमेंट फाऊंडेशनकडे हस्तांतरित केले जाणार आहे.
टाटा यांचे श्वानप्रेम कोणापासून लपून राहिलेले नाही. कुत्र्याला मदत करताना शांतनू नायडू भेटले. नायडू आपल्या मित्रांसोबत रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात रेडियम बँड बांधत असत. जेणेकरून त्यांना अपघात टाळता येतील. ही गोष्ट रतन टाटांना खूप आवडली. हळूहळू त्यांच्यातील नाते घट्ट होत गेले.
शांतनू अमेरिकेत शिक्षण घेऊन परतताच त्याला रतन टाटांच्या ऑफिसमध्ये जागा मिळाली. कार्यालयीन कामाव्यतिरिक्त शांतनू नायडू वेगवेगळी कामेही करत होते. त्यात गुडफेलोही होते. ही कंपनी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करते. याची सुरुवात २०२२ मध्ये झाली.
हे ज्येष्ठ उद्योजक आयुष्यातील शेवटचे काळ कुलाबा येथे वास्तव्यास होते. ही मालमत्ता टाटा सन्सची उपकंपनी इवार्ट इन्व्हेस्टमेंट्सची आहे. त्याचवेळी त्यांचे जुहू येथील घर गेल्या २० वर्षांपासून बंद आहे. येत्या काळात त्याची विक्री होऊ शकते, अशी चर्चा आहे. हे घर त्यांना वारशाने मिळाले होते.
भारतातील सर्वात श्रीमंत कुत्रा टिटो -
टाटांच्या इच्छापत्रात जर्मन शेफर्ड कुत्रा टिटोसाठी काळजी घेण्याची तरतूद केली आहे. रतन टाटा यांनी १० हजार कोटींहून अधिक संपत्ती मागे ठेवली आहे. ही मालमत्ता त्याच्या बहिणी शिरीन आणि डायना, घरातील कर्मचारी आणि इतरांमध्ये विभागली जाईल. मात्र, रतन टाटा यांच्या संपत्तीतील वाटा त्यांच्या कुत्र्यालाही मिळणार आहे. त्यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत श्वान ठरणार आहे.
पाच-सहा वर्षांपूर्वी टीटो दत्तक घेण्यात आला होता. रतन टाटा यांच्या इच्छेनुसार टीटोचे दीर्घकाळ स्वयंपाकी राहिलेले राज शॉ यांच्यावर त्यांच्या देखभालीची जबाबदारी असेल.
संबंधित बातम्या