Multibagger Stock : असा शेअर आपल्याला का मिळत नाही? ही बातमी वाचून तुम्हालाही असंच काहीसं वाटेल!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger Stock : असा शेअर आपल्याला का मिळत नाही? ही बातमी वाचून तुम्हालाही असंच काहीसं वाटेल!

Multibagger Stock : असा शेअर आपल्याला का मिळत नाही? ही बातमी वाचून तुम्हालाही असंच काहीसं वाटेल!

Dec 24, 2024 02:38 PM IST

Shakti Pumps Share Price : मागच्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल २९०० टक्के नफा मिळवून देणाऱ्या शक्ती पंप्सचा आज आणखी उसळला आहे.

एका वर्षात ५१० टक्क्यांनी उसळला शेअर; SBI आणि LIC ची आहे मोठी गुंतवणूक
एका वर्षात ५१० टक्क्यांनी उसळला शेअर; SBI आणि LIC ची आहे मोठी गुंतवणूक

Stock Market Updates : शक्ती पंप्स (इंडिया) लिमिटेड कंपनीच्या शेअरनं आज ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. बीएसईवर शक्ती पंप्सचा शेअरला आज, मंगळवारी ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं आणि हा शेअर १०११.३० रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ५१० टक्के वाढ झाली आहे. 

शक्ती पंप्सचा शेअर गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर ठरला आहे. यंदा या शेअरमध्ये आतापर्यंत सुमारे ४८९ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात शक्ती पंपच्या शेअरमध्ये ५१० टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या २ वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये १४८३ टक्के वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत शक्ती पंप्सचे शेअर्स ७५ टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. तर, शक्ती पंप्सचे शेअर्स एका महिन्यात २२ टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या ५ वर्षात २९०० टक्क्यांची वाढ झाली आहे.

दोन वेळा दिलेत बोनस शेअर्स

शक्ती पंप्स या कंपनीनं आपल्या शेअरहोल्डर्सना २ वेळा बोनस शेअर्सची भेट दिली आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये या कंपनीनं ५:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक एका शेअरसाठी ५ बोनस शेअर्सचं वाटप केलं आहे. यापूर्वी एप्रिल २०११ मध्ये कंपनीनं १:१ या प्रमाणात बोनस शेअर दिले होते. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक एका शेअरमागे एक बोनस शेअर दिला होता.

SBI आणि LIC म्युच्युअल फंडांची मोठी गुंतवणूक

एसबीआय म्युच्युअल फंड आणि एलआयसी म्युच्युअल फंडानं शक्ती पंप्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत एसबीआय म्युच्युअल फंडाकडं कंपनीचे २७,२३,९८२ शेअर्स आहेत. या कंपनीत एसबीआय म्युच्युअल फंडाचा २.२७ टक्के हिस्सा आहे. तर एलआयसी म्युच्युअल फंडाकडं कंपनीचे ४३,४५,८७८ शेअर्स आहेत. म्युच्युअल फंडाचा कंपनीत ३.६२ टक्के हिस्सा आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner