servotech power systems share price : ईव्हीचं युग सुरू झाल्यापासून या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर जोरात आहेत. सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स लिमिटेडही त्यास अपवाद नाही. इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जर बनवणाऱ्या या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या शेअरमध्ये अवघ्या चार वर्षांच्या आत ७,००० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स लिमिटेडला केरळ सरकारच्या ऊर्जा विभागाच्या एजन्सी फॉर न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (ANERT) कडून १२ ईव्ही चार्जिंग स्टेशन बसविण्याचं कंत्राट मिळालं आहे. या करारानुसार सर्वोटेक पॉवर सिस्टीम केरळ मोटार वाहन विभागाच्या विविध ठिकाणी ३० किलोवॅट फास्ट डीसी ईव्ही चार्जरसह १२ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. या करारामध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशनचा पुरवठा, कमिशनिंग आणि बांधकाम यांचा समावेश आहे.
सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स लिमिटेडच्या शेअरमध्ये चार वर्षांत ७०३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सर्वोटेक पॉवर सिस्टीम्सचा शेअर २९ ऑक्टोबर २०२१ रोजी १.९१ रुपयांवर होता. आज, २१ ऑगस्ट २०२४ रोजी हाच शेअर १३७.४० रुपयांवर पोहोचला आहे.
एखाद्या व्यक्तीनं २९ ऑक्टोबर २०२१ रोजी सर्वोटेक पॉवर सिस्टम्सच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ही गुंतवणूक कायम ठेवली असती तर त्या शेअर्सची किंमत आज ७१.९३ लाख रुपये झाली असती.
गेल्या वर्षभरात सर्वोटेक पॉवर सिस्टीम्सच्या शेअरमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स लिमिटेडचे शेअर्स २०५० टक्क्यांनी वधारले आहेत. १९ ऑगस्ट २०२२ रोजी सर्वोटेक पॉवरचा शेअर ६.३० रुपयांवर होता. २१ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर १३७.४० रुपयांवर पोहोचला आहे.