stock market updates : शेअर असावा तर असा! अवघ्या १२ दिवसांत पैसे दुप्पट; कंपनीचं नाव माहीत आहे का?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stock market updates : शेअर असावा तर असा! अवघ्या १२ दिवसांत पैसे दुप्पट; कंपनीचं नाव माहीत आहे का?

stock market updates : शेअर असावा तर असा! अवघ्या १२ दिवसांत पैसे दुप्पट; कंपनीचं नाव माहीत आहे का?

Jun 19, 2024 05:43 PM IST

moschip technologies share price : सेमीकंडक्टर कंपनी मोशिप टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये १२ दिवसांत १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या काळात कंपनीचा शेअर १२८.१० रुपयांवरून २५७.६५ रुपयांवर पोहोचला आहे.

अवघ्या १२ दिवसांत पैसे दुप्पट; हा शेअर कुठला माहीत आहे का?
अवघ्या १२ दिवसांत पैसे दुप्पट; हा शेअर कुठला माहीत आहे का?

moschip technologies share price : शेअर बाजारात एखाद्या कंपनीच्या शेअरचं नशीब कधी पालटेल आणि त्यासाठी कुठली बातमी कारण ठरेल हे सांगता येत नाही. साहजिकच त्याचा थेट फायदा गुंतवणूकदारांना होतो. मॉसचिप टेक्नॉलॉजीज या सेमीकंडक्टर बनविणाऱ्या कंपनीचे शेअरहोल्डर सध्या असाच अनुभव घेत आहेत.

गेल्या काही दिवसांत मॉसचिप टेक्नॉलॉजीज या छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आली आहे. ही तेजी आजही कायम राहिली आणि कंपनीच्या शेअरनं नवा उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजारात बुधवारी मॉसचिप टेक्नॉलॉजीजचा शेअर १३ टक्क्यांनी वधारून २५७.६५ रुपयांवर पोहोचला. या शेअरनं अवघ्या १२ दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी दर ७४.४५ रुपये आहे.

सेमीकंडक्टर आणि सिस्टीम डिझाइन सर्व्हिसेस कंपनी मॉसचिप टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये १२ दिवसांत १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरनं अवघ्या १२ दिवसांत लोकांचे पैसे दुप्पट केले आहेत. ३१ मे २०२४ रोजी मोशिप टेक्नॉलॉजीजचा शेअर १२८.१० रुपयांवर होता. बुधवार, १९ जून २०२४ रोजी कंपनीचा शेअर २५७.६५ रुपयांवर पोहोचला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं सेमीकंडक्टर डीएलआय योजनेअंतर्गत कंपनीच्या अर्जाला मंजुरी दिल्यानंतर ४ दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये ४४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

गेल्या ६ महिन्यांत मॉसचिप टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये १५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १९ डिसेंबर २०२३ रोजी कंपनीचा शेअर १००.१९ रुपयांवर होता. १९ जून २०२४ रोजी मॉसचिप टेक्नॉलॉजीजचा शेअर २५७.६५ रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये २०५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १९ जून २०२३ रोजी कंपनीचा शेअर ८१.७९ रुपयांवर होता. आज हाच शेअर २५७.६५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ४ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये १५५० टक्के वाढ झाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स १५ रुपयांवरून २५० रुपयांपर्यंत वधारले आहेत.

 

(डिस्क्लेमर: वरील वृत्त हे केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner