Adani Group : अदानी समूहाच्या काही सौद्यांची छाननी करणार सेबी, विनोद अदानींवरही करडी नजर
Adani Group : हिडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूह विविध प्रकारच्या सेबीच्या कडक शासक प्रक्रियेतून जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, सेबी अदानी समूहातील काही विशिष्ट सौद्यांची कसून चौकशी करत आहे.
Adani Group : गौतम अदानींचा भाऊ विनोद अदानी यांच्याशी संबंधित किमान तीन परदेशी कंपन्यांसोबत अदानी समुहाशी निगडित सौद्यातील 'रिलेटेड पार्टी' नियमांचे उल्लंघन केल्याचा तपास सेबी करत आहे. राॅयटर्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या अहवालात तीन कंपन्यांनी गौतम अदानींच्या अनलिस्टेड कंपन्यांमध्ये गेल्या १३ कंपन्यांमध्ये भरीव गुंतवणूक केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
विनोद अदानींच्या संबंधित प्रकरण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी हे एकतर लाभार्थी मालक किंवा संचालक आहेत किंवा ते तीनही परदेशी कंपन्यांशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडलेले आहेत. माहिती जाहीर न केल्यामुळे 'रिलेट पार्टी ट्रान्झॅक्शन्स'शी संबंधित नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचा तपास बाजार नियामक सेबी करत आहे.
रिलेटेड पार्टी म्हणजे काय ?
भारतीय कायद्यानुसार, सूचीबद्ध कंपनीचे थेट नातेवाईक, प्रवर्तक गट आणि उपकंपनी हे रिलेटेड पार्टी मानले जातात. कोणत्याही सूचीबद्ध कंपनीमध्ये बहुसंख्य भागभांडवल असणारी संस्था प्रमोटर्स मानले जातात आणि त्यांची भूमिका कंपनीच्या धोरणांवर प्रभाव टाकते.
असा आहे नियम ?
या कंपन्यांमधील व्यवहार नियामक आणि सार्वजनिक फाइलिंगद्वारे उघड करणे आवश्यक आहे. एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांना शेअर होल्डर्सची मंजुरी आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सामान्यतः आर्थिक दंड आकारला जातो.
सेबीने या घडामोडीबद्दल परिक्षण करण्यासाठी इमेल पाठवला आहे. परंतु कंपनीकडून त्याला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. याआधी बुधवारी पत्रकार परिषदेत सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी अदानीबाबत सुरू असलेल्या तपासावर भाष्य करण्यास नकार दिला.
अदानी समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की विनोद अदानी हे अदानी कुटुंबाचे सदस्य आहेत आणि प्रमोटर्स समूहाचा एक भाग आहेत, परंतु अदानी समूहाच्या कोणत्याही सूचीबद्ध कंपनीमध्ये किंवा त्याच्या उपकंपन्यांमध्ये कोणतेही व्यवस्थापकीय पदावर ते नाहीत.
संबंधित बातम्या