financial influencers : सेबी सोशल मिडियावर शेअर बाजार गुंतवणूकीशी निगडित बिगर नोंदणीकृत 'ईन्फ्लुएन्सर' संदर्भात नियम तसेच दिशादर्शकांना येत्या एक ते दोन दिवसात अंतिम स्वरुप देणार आहे. सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी यांनी या वृत्ताला पुष्टी दिली आहे. त्या म्हणाल्या, येत्या काही दिवसात 'ईन्फ्लुएन्सर'च्या नियमांसाठी एक पत्र जारी केले जात आहे. पुढील दोन महिन्यात ते प्रकाशित केलं जाईल.एखादी व्यक्ती गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसंदर्भात जागरुक करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यात वावगं नाही. मात्र कोणत्याही उद्देशाशिवाय फुकट गुंतवणूकीचा सल्ला देत असेल आणि ती व्यक्ती सेबीकडे नोंदणीकृत नाही, यावर आमचा आक्षेप आहे.
आयकर विभागाने देशातील प्रमुख ३५ सोशल मिडिया 'ईन्फ्लुएन्सर' नी कोट्यवधी रुपये कर बुडवल्याच्या प्रकरणी नोटीस पाठवली आहे.त्याचवेळी सेबीकडून हे वक्तव्य जारी करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात केरळमध्ये १३ मोठ्या यूट्यूबर्सच्या ठिकाणी तपास अभियान चालवण्यात आले होते. काही 'ईन्फ्लुएन्सर' सोशल मिडियावर यूजर्सच्या संख्येच्या आधारावर मोठ्या रकमेचे कमिशन कमावतात. पण त्याचबरोबर स्टाॅकच्या सल्लासाठीही ते शुल्क आकारतात.
यूट्यूब, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाॅट्सअॅप आणि ट्विटरसारख्या सोशल मिडिया मंचावर आर्थिक सल्ला देणाऱ्या व्यक्तींना सेबी पुर्वीपासूनच सुचित करतात. पण तरीही 'ईन्फ्लुएन्सर'ची वाढती संख्या लक्षात घेऊन सेबीने त्याच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.
संबंधित बातम्या