मराठी बातम्या  /  बिझनेस  /  whatsapp Banking : ही बँक देणार व्हाॅट्सअॅपवर पेन्शन स्लीप, बँक बॅलेन्सही कळणार

whatsapp Banking : ही बँक देणार व्हाॅट्सअॅपवर पेन्शन स्लीप, बँक बॅलेन्सही कळणार

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 01, 2023 03:42 PM IST

whatsapp Banking : सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन स्लिप व्हाॅट्सअपॅपवर देण्यास सुरुवात केली आहे.किंबहुना तुम्ही मिनी बँक स्टेटमेंटही व्हाॅट्सअॅपवर मागवू शकतात.

Whatsapp_HT
Whatsapp_HT (PTI)

SBI WhatsApp banking service : देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक उत्तम सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे पेन्शन स्लिप मिळवू शकतात.

या नव्या सुविधेमुळे ग्राहकांसाठी बँकिंग प्रक्रिया सुलभ होणार असल्याचे एसबीआय बँकेने जाहीर केले आहे. एसबीआयची व्हॉट्सअॅप सेवा सुरू करण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या क्रमांकावर फक्त ‘हाय’ पाठवावा लागेल.या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना प्रथम एसबीआय  इंटरनेट बँकिंग किंवा योनो एसबीआय अॅपद्वारे नोंदणी करावी लागेल.

तुम्ही त्याची संपूर्ण प्रक्रिया याप्रमाणे आहे. एसबीआयची व्हॉट्सअॅप सेवा सुरू करण्यासाठी, तुम्ही प्रथम बँकेच्या व्हाॅटसअॅप क्रमांक ९०२२६९०२२६ वर 'हाय' पाठवावा.

बँक बॅलन्सही पाहता येणार

आता एसबीआयही आपल्या ग्राहकांना व्हॉट्सअॅपद्वारे बँक बॅलन्स तपासण्याची सुविधा देत आहे. त्याच वेळी, याद्वारे आपण मिनी स्टेटमेंटची विनंती देखील करू शकता. व्हॉट्सअॅप बँकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी खातेदाराने प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. बँकेची ही सेवा ग्राहकांना वर्षातील ३६५ दिवसांमध्ये २४×७ उपलब्ध आहे.

ही आहे प्रक्रिया

एसबीआय ऑनलाइन मध्ये साइन इन करा आणि रिक्वेस्ट अॅड इन्क्वायरी या पर्यायावर जा. 'ऑनलाइन नोंदणी' वर क्लिक करा आणि नंतर खाते क्रमांक निवडा. येथे नामनिर्देशित व्यक्तीची माहिती भरा आणि सबमिट करा. याशिवाय, तुम्ही ही संपूर्ण प्रक्रिया एसबीआय़च्या मोबाईल बँकिंग अॅप योनाद्वारे करू शकता.

WhatsApp channel

संबंधित बातम्या