SBI recruitment news : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेत ११०० हून अधिक पदांसाठी भरती होणार आहे. मॅनेजर, ऑफिसर, क्लार्क, इकॉनॉमिस्ट, बँकिंग अॅडव्हायझर आणि इतर पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार बँकेच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (इकॉनॉमिस्ट अँड डिफेन्स बँकिंग अॅडव्हायझर) पदासाठी १७ जुलै पासून नोंदणी सुरू झाली असून स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (व्हीपी वेल्थ, मॅनेजर आणि इतर पदे) पदासाठी १९ जुलै २०२४ पासून नोंदणी सुरू झाली आहे. इकॉनॉमिस्ट आणि डिफेन्स बँकिंग अॅडव्हायझर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट आहे आणि व्हीपी वेल्थ, मॅनेजर आणि इतर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट २०२४ आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्रीडा कोट्यातून अधिकारी/लिपिक संवर्गातील भरतीसाठी २४ जुलैपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १४ ऑगस्ट २०२४ रोजी संपणार आहे.
खेळाडू भरतीसाठी निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग आणि मूल्यांकन चाचणीवर आधारित असेल. निवडीसाठी तीन निकष वापरले जातील. यात मान्यताप्राप्त क्रीडा कामगिरीचं मूल्यांकन, सामान्य बुद्धिमत्ता / खेळ / व्यक्तिमत्व ज्ञान आणि सक्रियता आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा समावेश आहे.
अर्थतज्ज्ञ आणि संरक्षण बँकिंग सल्लागारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. मुलाखत किंवा संवाद १०० गुणांचा असेल. मुलाखतीमध्ये बँक पात्रता गुण निश्चित करेल.
व्हीपी वेल्थ, मॅनेजर आणि इतर पदांसाठी निवड प्रक्रियेत शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यू-कम-सीटीसी वाटाघाटींचा समावेश आहे.
सर्वसाधारण/ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांसाठी वर नमूद केलेल्या सर्व पदांसाठी अर्ज शुल्क व सूचना शुल्क ७५०/- रुपये आहे.
एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग इत्यादींचा वापर करून स्क्रीनवर विचारल्याप्रमाणे माहिती देऊन पेमेंट करता येते.
अधिक माहितीसाठी उमेदवार एसबीआयची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.