SBI PO Recruitment News : नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नं प्रोबेशनरी ऑफिसर (PO) च्या तब्बल २,००० रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. आजपासूनच (७ सप्टेंबर) त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रोबेशनरी ऑफिसर्स पदांसाठी भरतीची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२३ असून इच्छुक उमेदवार sbi.co.in, www.sbi.co.in/career, bank.sbi/careers/current-openings या वेबसाइट्सना भेट देऊन अर्ज करू शकतात.
रिक्त पदांपैकी ८१० पदं सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत. एकूण ५४० पदं ओबीसी, २०० जागा आर्थिक दुर्बल घटकांसाठी, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ३०० आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १५० जागा राखीव आहेत.
SBI PO प्रिलिम्स परीक्षा नोव्हेंबर २०२३ मध्ये घेतली जाईल. उमेदवारांची निवड तीन टप्प्यातील परीक्षेद्वारे केली जाईल.
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.
प्रोबेशनरी ऑफिसर्स पदासाठी वयोमर्यादा २१ वर्षे ते ३० वर्षे आहे. त्यासाठी १ एप्रिल २०२३ पासून वय गृहित धरलं जाईल. अर्जदाराचा जन्म २ एप्रिल १९९३ पूर्वी आणि १ एप्रिल २००२ नंतर झालेला नसावा. एससी व एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षाची तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सूट मिळेल.
प्रिलिम्स, मुख्य, सायकोमेट्रिक चाचणी (गट चर्चा आणि मुलाखत).
प्रिलिम्स परीक्षेतील गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात सायकोमेट्रिक चाचणीसाठी बोलावलं जाईल.
पगार : मूळ वेतन रु. ४१,९६०/- (४ अॅडव्हान्स इन्क्रिमेंटसह) घरभाडे, महागाई भत्त्यासह विविध भत्ते
ऑनलाइन अर्ज / बदल - ७ सप्टेंबर २०२३ ते २७ सप्टेंबर २०२३
अर्ज शुल्क भरणा - ७ सप्टेंबर २०२३ ते २७ सप्टेंबर २०२३
ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्राथमिक परीक्षेचे कॉल लेटर येईल.
पहिला टप्पा : ऑनलाइन प्राथमिक परीक्षा - नोव्हेंबर २०२३
प्राथमिक परीक्षेच्या निकालाची घोषणा - नोव्हेंबर/डिसेंबर २०२३
मुख्य परीक्षा कॉल लेटर - नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२३
दुसरा टप्पा : ऑनलाइन मुख्य परीक्षा - डिसेंबर २०२३/जानेवारी २०२४
मुख्य परीक्षेचा निकाल - डिसेंबर २०२३/जानेवारी २०२४
तिसरा टप्पा - जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२४ नंतर कॉल लेटर डाउनलोड करता येईल.
सायकोमेट्रिक चाचणी - जानेवारी/फेब्रुवारी २०२४
मुलाखत आणि गट चर्चा - जानेवारी/फेब्रुवारी २०२४
फायनल निकाल - फेब्रुवारी/मार्च २०२४
एससी, एसटी व दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही. इतरांना ७५० रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागतील.
संबंधित बातम्या