sbi life news : एसबीआय लाइफ इन्शुरन्सनं आणले दोन नवे प्लान; काय आहे खास?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  sbi life news : एसबीआय लाइफ इन्शुरन्सनं आणले दोन नवे प्लान; काय आहे खास?

sbi life news : एसबीआय लाइफ इन्शुरन्सनं आणले दोन नवे प्लान; काय आहे खास?

Jan 24, 2024 03:51 PM IST

SBI Life launches new insurance plans : एसबीआय लाइफ इन्शुरन्सनं सरल स्वधन सुप्रीम आणि स्मार्ट स्वधन सुप्रीम या दोन नव्या इन्शुरन्स स्कीम आणल्या आहेत.

SBI Life
SBI Life

SBI Life Insurance new plans : देशातील सर्वात विश्वासार्ह खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सनं नुकतीच 'एसबीआय लाइफ - सरल स्वधन सुप्रीम' आणि 'एसबीआय लाइफ - स्मार्ट स्वधन सुप्रीम' या दोन नव्या पॉलिसी आणल्या आहेत. ग्राहकांना जीवन विम्याचं संरक्षण कवच पुरवतानाच त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्याचा प्रयत्न या पॉलिसींच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

या दोनपैकी कुठलीही पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीचा पॉलिसीच्या मुदतीत मृत्यू झाल्यास त्याला एकरकमी लाभ दिला जाणार आहे. तसंच, पॉलिसी मॅच्युअर होईपर्यंत विमाधारक जिवंत असला तरी त्यानं भरलेल्या एकूण प्रीमियमची परतफेड देखील करतात.

Budget 2024 : इन्कम टॅक्समध्ये सूट मिळणार का?; करदात्यांना काय वाटते पाहा!

पॉलिसीधारकाला मृत्यूसारख्या अप्रिय व अनिश्चित घटनांपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण करता यावं. त्याचबरोबर त्यांच्यासाठी उत्तम आर्थिक तजवीज करता यावी या दृष्टीनं अत्यंत विचारपूर्वक या प्लान्सची रचना करण्यात आली आहे. प्रीमियम भरणा, पॉलिसी कालावधी, प्रीमियम भरण्याची वारंवारता या सगळ्यामध्ये अनेक पर्याय देण्यात आले आहेत.

नव्या पॉलिसी पूर्णपणे ग्राहककेंद्री आहेत. ग्राहकांना यात अनेक पर्याय आहेत, असं एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे बिझनेस स्ट्रॅटेजी विभागाचे अध्यक्ष अभिजीत गुलानीकर यांनी सांगितलं. सध्याच्या काळात प्रत्येक आर्थिक निर्णयाला विशेष महत्त्व असतं. अशा परिस्थिती या पॉलिसी महत्त्वाच्या आहेत. या पॉलिसी पारंपरिक विम्याच्या पलीकडचा विचार करून तयार केलेल्या आहेत, असंही ते म्हणाले. नव्या योजनांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे…

प्रीमियम फ्लेक्सिबिलिटी

पॉलिसीधारक नियमित प्रीमियम पेमेंटची निवड करू शकतात किंवा ७, १० किंवा १५ वर्षांच्या मर्यादित प्रीमियम भरण्याच्या पर्यायाची निवडू शकतात.

पॉलिसी टर्म

या पॉलिसी १० ते ३० वर्षांच्या कालावधीसाठी काढता येतात.

मॅच्युरिटी बेनिफिट

मॅच्युरिटीनंतर पॉलिसीधारकाला पॉलिसीच्या कालावधीत भरलेल्या एकूण प्रीमियमच्या १०० टक्के (कोणताही अतिरिक्त प्रीमियम, कोणताही राइडर प्रीमियम आणि कर वगळून) रक्कम परत मिळते.

National Girl Child Day : तुमच्या मुलीचं भविष्य घडवू शकतात 'या' पाच योजना

विम्याची रक्कम

या दोन्ही पॉलिसींमध्ये किमान २५ लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते, परंतु एसबीआय लाइफ - सरल स्वधन सुप्रीम या पॉलिसीची कमाल मर्यादा ५० लाख रुपयांपर्यंतच आहे. एसबीआय लाइफ - स्मार्ट स्वधन सुप्रीम ही पॉलिसी कितीही वर्षांसाठी काढता येते. त्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.

Whats_app_banner