मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SBI FD : स्टेट बँकेनं आणली दोन वर्षांची विशेष FD स्कीम; व्याज किती मिळणार माहित्येय?

SBI FD : स्टेट बँकेनं आणली दोन वर्षांची विशेष FD स्कीम; व्याज किती मिळणार माहित्येय?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 14, 2023 01:05 PM IST

SbI Sarvottam fd : स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांसाठी 'एसबीआय सर्वोत्तम' ही नवी एफडी स्कीम सुरू केली आहे.

State Bank of India
State Bank of India

State Bank of India Sarvottam FD Scheme : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना एक जबरदस्त भेट दिली आहे. बँकेनं दोन वर्षांसाठी 'एसबीआय सर्वोत्तम' नावाची नवीन मुदत ठेव (FD) योजना सुरू केली आहे.

एसबीआय सर्वोत्तम योजनेअंतर्गत, बँक आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना ७.४० टक्के व्याज देणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीच्या एफडीसाठी ७.९० टक्के म्हणजेच, ०.५० टक्के व्याज अधिक मिळणार आहे. स्टेट बँकेनं याआधीच ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.

कोण आणि किती रकमेपासून करू शकतं गुंतवणूक?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या सर्वोत्तम एफडी योजनेत, कोणताही भारतीय नागरिक आणि संस्था गुंतवणूक करू शकते. अल्पवयीन आणि अनिवासी भारतीयांना (एनआरआय) बँकेच्या या विशेष एफडी योजनेत गुंतवणूक करता येणार नाही. किमान १५.०१ लाखांसह या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. तर, या योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त २ कोटी रुपयांपर्यंत एफडी करता येऊ शकते.

असं मिळेल व्याज

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नं ग्राहकांसाठी वेगवेगळ्या एफडी योजना सुरू केल्या आहेत. त्यात सामान्य ग्राहकांना ३ ते ७.१० टक्के व्याज दिलं जातं. तर, ज्येष्ठ नागरिक असलेल्या ग्राहकांना ३.५० टक्के ते ७.५० टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं. स्टेट बँकेत ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीसाठी FD करता येते. याशिवाय, बँकेत कर बचतीसाठी पात्र असलेल्या एफडी योजना देखील आहेत. त्या अंतर्गत सर्वसामान्य ग्राहकाला ६.५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकाला ७.५० टक्के व्याज मिळतं.

WhatsApp channel