SBI New scheme : श्रीमंत व्हा! स्टेट बँकेनं सुरू केल्या दोन खास योजना; ग्राहकांना मिळणार वाढीव व्याज
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SBI New scheme : श्रीमंत व्हा! स्टेट बँकेनं सुरू केल्या दोन खास योजना; ग्राहकांना मिळणार वाढीव व्याज

SBI New scheme : श्रीमंत व्हा! स्टेट बँकेनं सुरू केल्या दोन खास योजना; ग्राहकांना मिळणार वाढीव व्याज

Jan 04, 2025 03:41 PM IST

SBI New Deposit scheme News : स्टेट बँक ऑफ इंडियाने 'हर घर लखपती' आणि 'एसबीआय पॅट्रन्स' या दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमुळं ग्राहकांना आकर्षक व्याज दराचा लाभ घेण्याबरोबरच आर्थिक उद्दिष्टे साध्य करणं सुलभ होणार आहे.

श्रीमंत व्हा! स्टेट बँकेनं सुरू केल्या दोन खास योजना; ग्राहकांना मिळणार वाढीव व्याज
श्रीमंत व्हा! स्टेट बँकेनं सुरू केल्या दोन खास योजना; ग्राहकांना मिळणार वाढीव व्याज

SBI New Deposit scheme News in Marathi : बँकेत पैसे जमा करून व्याज मिळवणाऱ्या ग्राहकांपैकी तुम्ही एक असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी हर घर लखपती आणि एसबीआय पॅट्रन्स या दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. वाढीव व्याजदारामुळं या योजनांचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. 

बँकेनं एका निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, 'हर घर लखपती' ही एक आवर्ती ठेव योजना आहे. ग्राहकांनी १,००,००० रुपये किंवा त्याच्या पटीत रक्कम जमा करण्याच्या दृष्टीनं या योजनेची रचना करण्यात आली आहे. या योजनेमुळं वेगवेगळी आर्थिक उद्दिष्टे साध्य करणं ग्राहकांना सोपं जाणार आहे. ही योजना ग्राहकांना सुनियोजित बचत करण्यास प्रोत्साहित करते. अल्पवयीन ग्राहकांना देखील या योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेचा किमान कालावधी १२ महिने (एक वर्ष) आणि जास्तीत जास्त कालावधी १२० महिने (१० वर्षे) आहे.

एसबीआय पॅट्रन्स

याशिवाय स्टेट बँकेनं ८० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एसबीआय पॅट्रन्स' ही विशेष मुदत ठेव योजना सुरू केली आहे. अनेक ज्येष्ठ ग्राहकांचे बँकेशी असलेले जुने संबंध लक्षात घेऊन ही योजना वाढीव व्याजदर देते. 'एसबीआय पॅट्रन' ही सध्याच्या आणि नवीन दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. 

किती मिळणार व्याज?

'एसबीआय पॅट्रन्स' योजनेतील ठेवीदारांना ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या व्याजदरापेक्षा ०.१ टक्के अधिक व्याज मिळणार आहे, तर रिकरिंग डिपॉझिट स्कीमवरील व्याज मुदत ठेवींवर देण्यात येणाऱ्या दरांइतकेच असेल. 

सध्या एक वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर ६.८० टक्के, दोन वर्षांहून अधिक कालावधीसाठी ७ टक्के, ३ वर्षांहून अधिक आणि ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ६.७५ टक्के आणि ५ ते १० वर्षांसाठी ६.५ टक्के व्याज दर आहे. 

अनिवासी भारतीयांसाठी आनंदाची बातमी

अनिवासी भारतीयांसाठी एनआरई (अनिवासी आउटसाइडर) आणि एनआरओ (अनिवासी सामान्य) खाती उघडण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बँकेनं टॅब-आधारित एन्ड-टू-एन्ड डिजिटल ऑन-बोर्डिंग प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Whats_app_banner