मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SBI Amrit Kalash : स्टेट बँकेनं आणली जबरदस्त एफडी स्कीम; अवघ्या ४०० दिवसांत मिळणार तगडा परतावा

SBI Amrit Kalash : स्टेट बँकेनं आणली जबरदस्त एफडी स्कीम; अवघ्या ४०० दिवसांत मिळणार तगडा परतावा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 17, 2023 12:00 PM IST

SBI Amrit Kalash FD Scheme : देशाच्या अमृतमहोत्सवाचं औचित्य साधून स्टेट बँक ऑफ इंडियानं एक खास मुदत ठेव योजना सुरू केली आहे.

State Bank Of India
State Bank Of India

SBI Amrit Kalash FD Scheme : मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक फायद्याची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांसाठी एक जबरदस्त मुदत ठेव योजना सुरू केली आहे. यात ग्राहकांना कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त परतावा मिळू शकणार आहे.

'अमृत कलश योजना' असं स्टेट बँकेच्या या एफडी योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती १५ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत पैसे जमा करू शकते.

स्टेट बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, अमृत कलश योजनेंतर्गत सामान्य नागरिकांना ७.१० टक्के व्याज मिळणार आहे. तर, याच योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अधिक व्याज दिलं जाणार आहे. म्हणजेच या विशेष योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज मिळणार आहे. याशिवाय स्टेट बँक आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना या विशेष योजनेवर १ टक्के अतिरिक्त व्याज देणार आहे.

४०० दिवसांचा कालावधी

या योजनेचा एकूण कालावधी ४०० दिवसांचा आहे. या योजनेत ग्राहक ३१ मार्च २०२३ पर्यंत रुपये जमा करू शकतात.

अन्य मुदत ठेवींचे व्याजदरही वाढले!

अमृत कलश मुदत ठेव योजना सुरू करतानाच स्टेट बँकेनं इतर एफडी आणि आरडीचे व्याजदरही वाढवले आहेत. सध्या स्टेट बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर अनुक्रमे ३ ते ६.५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ३.५० ते ७.२५ टक्के व्याजदर देते.

WhatsApp channel