Bank FD Rates : मुदत ठेवींवर (Fixed Deposits) या गुंतवणूक पर्यायावर तुमचा विश्वास असेल आणि तुम्ही एफडी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. देशातील अनेक मोठ्या सरकारी आणि खासगी बँका आपल्या ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ८ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.
एफडीवर भरघोस व्याज देणाऱ्या या बँकांमध्ये डीसीबी बँक पहिल्या क्रमांकावर आहे. डीसीबी बँक आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना एक वर्षाच्या एफडीवर ७.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७.७५ टक्के व्याज देत आहे. इतर ९ बँकाही असंच भरघोस व्याज देत आहेत.
तामिळनाडू मर्कन्टाइल बँक (Tamilnad mercantile bank) आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ७.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७.७५ टक्के व्याज देत आहे.
कॅनरा बँक (Canara Bank) आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना एक वर्षाच्या एफडीवर ७ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७.५० टक्के व्याज देत आहे.
कर्नाटक बँक (Karnataka Bank) आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ७ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७.४० टक्के व्याज देत आहे.
डॉयचे बँक (deutsche bank) आपल्या सर्व प्रकारच्या ग्राहकांना एक वर्षाच्या एफडीवर ७ टक्के व्याज व्याज देत आहे.
आरबीएल बँक (RBL Bank) आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ७ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७.५० टक्के व्याज देत आहे.
बँक ऑफ इंडिया (Bank of India) आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ७ टक्के आणि आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७.५० टक्के व्याज देत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ६.८० टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७.३० टक्के व्याज देत आहे.
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) आपल्या सामान्य ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ७ टक्के आणि आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७.२५ टक्के व्याज देत आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central bank of India) आपल्या सामान्य ग्राहकांना १ वर्षाच्या एफडीवर ६.७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७.२५ टक्के व्याज देत आहे.