SBI MCLR : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँकेनं कर्जावरील मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेट (MCLR) जाहीर केला आहे. त्यानुसार एक महिन्याच्या मुदतीच्या व्याजदरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. इतर दर कायम आहेत. सुधारित एमसीएलआर १५ ऑक्टोबरपासून म्हणजे आजपासूनच लागू होणार आहे.
एमसीएलआर आधारित व्याजदर ८.२० टक्के ते ९.१ टक्क्यांच्या दरम्यान अॅडजस्ट करण्यात आले आहेत. एका रात्रीच्या कालावधीसाठी एमसीएलआर ८.२० टक्के, एका महिन्याचा दर ८.४५ टक्क्यांवरून ८.२० टक्के, सहा महिन्यांचा एमसीएलआर ८.८५ टक्के, एक वर्षाचा एमसीएलआर ८.९५ टक्के, दोन वर्षांचा एमसीएलआर ९.०५ टक्के आणि तीन वर्षांचा एमसीएलआर ९.१ टक्के आहे.
एसबीआयचा किमान व्याजदर १०.४० टक्के, बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) १५ सप्टेंबरपासून १५.१५ टक्के आणि एसबीआय होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (ईबीएलआर) ९.१५ टक्के आहे.
गृहकर्जावरील व्याजदर ८.५० टक्के ते ९.६५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. कर्जदाराच्या सिबिल स्कोअरनुसार तो वेगवेगळा असेल.
एसबीआयच्या होम लोन वेबसाईटवरील माहितीनुसार, रेपो रेटमध्ये बदल झाल्यास होम / होम रिलेटेड लोन खात्यातील व्याजदरातही बदल केला जाईल. रेपो दरात वाढ केल्यानं गृह/गृहविषयक कर्जावरील व्याजदरात वाढ होणार आहे.
संबंधित बातम्या