आरबीआयच्या व्याजदर कपातीमुळे SBIच्या एफडी योजनांमध्ये बदल
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  आरबीआयच्या व्याजदर कपातीमुळे SBIच्या एफडी योजनांमध्ये बदल

आरबीआयच्या व्याजदर कपातीमुळे SBIच्या एफडी योजनांमध्ये बदल

HT Marathi Desk HT Marathi
Published Apr 14, 2025 05:47 PM IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदर कमी केले, त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने अमृत कलश एफडी योजना बंद केली. नवीन अमृत वृष्टी योजनेंतर्गत 444 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 7.05% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.55% व्याज मिळेल.

एसबीआयचा दुहेरी झटका, एफडीवरील व्याजदरात कपात, अमृत कलश एफडी योजनाही बंद
एसबीआयचा दुहेरी झटका, एफडीवरील व्याजदरात कपात, अमृत कलश एफडी योजनाही बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा व्याजदरात कपात केली आहे. याचा परिणाम आता बँकांच्या एफडी योजनेवर होऊ लागला आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने अमृत कलश एफडी योजना बंद केली आहे. त्याचबरोबर नॉर्मल एफडी स्कीम्समध्ये ठराविक कालावधीसाठी व्याजदरात कपात करण्यात आली आहे.

भारतीय स्टेट

बँकेने अमृत वृष्टी योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 444 दिवसांच्या एफडीवर 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. एसबीआयने काही काळासाठी सामान्य एफडीवरील व्याजदरात १० बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे.

एसबीआयने केलेल्या बदलानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी चा व्याजदर आता ३.५० टक्क्यांवरून ६.९० टक्के करण्यात आला आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 4 टक्क्यांवरून 7.50 टक्के करण्यात आला आहे (यात एसबीआय वी केअरचाही समावेश आहे).

सामान्य

नागरिकांना आता 1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 6.80 टक्क्यांऐवजी 6.70 टक्के व्याज मिळणार आहे. तर 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 3 वर्षांच्या एफडीवरील व्याज आता 7 टक्क्यांवरून 6.90 टक्के करण्यात आले आहे.

एसबीआय ज्येष्ठ नागरिक एफडी दर ज्येष्ठ नागरिक एफडी दर

ज्येष्ठ नागरिक एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.30 टक्क्यांऐवजी फक्त 7.20 टक्के व्याज मिळेल. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीच्या एफडीवर बँक 7.50 टक्क्यांऐवजी 7.40 टक्के व्याज देईल. वीकेअर अंतर्गत बँक आपल्या गुंतवणूकदारांना एफडीवर 50 बेसिस पॉईंट्स अतिरिक्त व्याज देत राहील.

भारतीय स्टेट बँकेने अमृत वृष्टी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत एसबीआयमध्ये सामान्य नागरिकांना 444 दिवसांच्या एफडीवर 7.05 टक्के व्याज दिले जाणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के व्याज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. नवे दर 15 एप्रिल 2025 पासून लागू होतील.

Whats_app_banner