IPO News : शेअर बाजारातील अस्थिरतेच्या वातावरणात आज रिटेल गुंतवणूकदारांसाठी सात करतार शॉपिंग आयपीओ खुला होत आहे. हा पूर्णपणे फ्रेश इश्यू आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून ४१.७३ लाख नवे शेअर्स जारी करणार असून ३३.८० कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट आहे. हा आयपीओ १४ जानेवारीपर्यंत खुला राहणार आहे.
सात करतार शॉपिंग आयपीओसाठी ७७ ते ८१ रुपये प्रति शेअर असा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. कंपनीनं एकूण १६०० शेअर्सचा लॉट केला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना किमान १ लाख २९ हजार ६०० लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. या आयपीओची लिस्टिंग १७ जानेवारीला प्रस्तावित आहे. ही कंपनी एनएसई एसएमईवर लिस्ट होणार आहे.
आयपीओचा ५० टक्के भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान ३५ टक्के शेअर राखीव ठेवण्यात येणार आहे. कंपनीचा किमान १५ टक्के हिस्सा एनआयआयसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
अँकर गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ ९ जानेवारी रोजी खुला करण्यात आला. कंपनीनं अँकर इन्व्हेस्टर्सच्या माध्यमातून ९.५५ कोटी रुपये उभे केले आहेत.
इन्व्हेस्टर्स गेनच्या अहवालानुसार, ग्रे मार्केटमध्ये सात करतार शॉपिंग आयपीओची स्थिती बरीच मजबूत आहे. हा आयपीओ आज २५ रुपयांच्या जीएमपीवर उपलब्ध आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक जीएमपी आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास हा आयपीओ १०० रुपयांच्या पुढं लिस्ट होऊ शकतो.
ही आयुर्वेद कंपनी आहे. ही कंपनी विविध आजारांवर औषधे तयार करते. कंपनी आपली बहुतेक विक्री ऑनलाइन करते (वेबसाइट आणि ईकॉमर्स प्लॅटफॉर्मच्या आधारे). याशिवाय सात करतार शॉपिंग टीव्ही मार्केटिंगच्या माध्यमातूनही आपल्या वस्तूंची विक्री करते.
संबंधित बातम्या