Bonus Shares : सहा महिन्यांत जवळपास तिप्पट परतावा देणाऱ्या कंपनीनं आता केली बोनस शेअर्सची घोषणा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bonus Shares : सहा महिन्यांत जवळपास तिप्पट परतावा देणाऱ्या कंपनीनं आता केली बोनस शेअर्सची घोषणा

Bonus Shares : सहा महिन्यांत जवळपास तिप्पट परतावा देणाऱ्या कंपनीनं आता केली बोनस शेअर्सची घोषणा

Jan 30, 2025 11:57 AM IST

Sangam Finserv Bonus Shares : संगम फिनसर्व्हनं आपल्या भागधारकांना ४:१ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल ३०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

सहा महिन्यांत जवळपास तिप्पट परतावा देणाऱ्या कंपनीनं आता केल्या मोफत शेअर देण्याची घोषणा
सहा महिन्यांत जवळपास तिप्पट परतावा देणाऱ्या कंपनीनं आता केल्या मोफत शेअर देण्याची घोषणा

Share Market : मागील सहा महिन्यांत आपल्या शेअरहोल्डर्सना तब्बल १९४ टक्के (जवळपास तिप्पट) परतावा देणारी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) संगम फिनसर्व्हनं आता बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. त्यानुसार, कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना ४:१ या प्रमाणात मोफत शेअर्स देणार आहे. म्हणजेच प्रत्येक एका शेअरमागे ४ शेअर्स दिले जाणार आहेत. 

बोनस शेअरची रेकॉर्ड डेट ७ फेब्रुवारी २०२५ ही निश्चित करण्यात आली आहे. संगम फिनसर्व्हच्या शेअर्समध्येही चांगली वाढ दिसून येत आहे. गुरुवारी बीएसईवर कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ३००.५० रुपयांवर पोहोचला. गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये १६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

कशी आहे शेअरची वाटचाल?

संगम फिनसर्व्हच्या शेअरमध्ये गेल्या सहा महिन्यांत १९४ टक्के वाढ झाली 
आहे. ३० जुलै २०२४ रोजी कंपनीचा शेअर १०२.१५ रुपयांवर होता. आज तो ३००.५० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यांत संगम फिनसर्व्हच्या शेअरमध्ये ५४ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ३०१.३५ रुपये आहे, तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ७१.५० रुपये आहे.

गेल्या वर्षभरात संगम फिनसर्व्हच्या शेअरमध्ये ३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ३० जानेवारी २०२४ रोजी हा शेअर ७४.७६ रुपयांवर व्यवहार करत होता. आज ३० जानेवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर ३००.५० रुपयांवर पोहोचला. संगम फिनसर्व्हच्या शेअरमध्ये गेल्या दोन वर्षांत ४३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांत संगम फिनसर्व्हचे समभाग ३९४ टक्क्यांनी वधारले आहेत. तर, ५ वर्षात कंपनीचे शेअर्स ७२३ टक्क्यांनी वधारले आहेत.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner