मोबाइल आहे की रुमाल? चक्क घड्या घालता येणार; सॅमसंग आणतोय ट्रिपल फोल्डिंग स्मार्टफोन
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  मोबाइल आहे की रुमाल? चक्क घड्या घालता येणार; सॅमसंग आणतोय ट्रिपल फोल्डिंग स्मार्टफोन

मोबाइल आहे की रुमाल? चक्क घड्या घालता येणार; सॅमसंग आणतोय ट्रिपल फोल्डिंग स्मार्टफोन

Jan 08, 2025 09:36 PM IST

Samsung Triple-Fold Phone : दक्षिण कोरियातील स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग यावर्षात आपला ट्रिपल फोल्ड स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली.

सॅमसंग आणतोय ट्रिपल फोल्डिंग स्मार्टफोन
सॅमसंग आणतोय ट्रिपल फोल्डिंग स्मार्टफोन

Upcoming Triple- Fold Phone : हुवावे मेट एक्सटी अल्टिमेट डिझाइन हा जगातील पहिला ट्रिपल स्क्रीन फोल्डेबल फोन म्हणून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च करण्यात आला होता. तेव्हापासून वेबवर सॅमसंगच्या पहिल्या ट्रायफोल्ड फोनच्या अफवा पसरू लागल्या आहेत. लीक झालेल्या माहितीनुसार, सॅमसंग या वर्षाच्या उत्तरार्धात ट्रिपल फोल्डिंग स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा फोन मर्यादित असेल, असेही सांगण्यात येत आहे. तसेच हा फोन जी-टाइप ट्रिपल-फोल्डिंगसह बाजारात येऊ शकतो.

कोरियन पब्लिकेशन सिसा जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, सॅमसंग या वर्षाच्या उत्तरार्धात आपल्या नेक्स्ट जनरेशन फोल्डेबल फोनसह ट्राय-फोल्ड फोन देखील सादर करणार आहे. सॅमसंग 'जी-टाइप' ट्रिपल फोल्डिंग फोन लॉन्च करणार असल्याचे सांगितले जात आहे, जो स्क्रीनला तीन भागांमध्ये फोल्ड करतो. स्मार्टफोन फोल्ड झाल्यावर प्रॉडक्टच्या आत स्क्रीन येईल. या इन-फोल्डिंग प्रक्रियेमुळे डिस्प्लेला स्क्रॅचपासून संरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या हुवावे मेट एक्सटी अल्टिमेट डिझाइनमध्ये एस-आकाराची इन-एंड-आऊट फोल्डेबल स्क्रीन आहे.

याव्यतिरिक्त, अहवालात म्हटले आहे की सॅमसंग ट्रिपल फोल्डिंग फोनचे केवळ ३ लाख युनिट्स (किंवा त्यापेक्षा कमी) उत्पादन करेल. हा फोनची किंमत लाखो रुपयांत असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

किंमत दोन लाखांहून अधिक असण्याची शक्यता

सॅमसंगच्या ट्रिपल फोल्ड फोनमध्ये तीन डिस्प्ले पॅनेल आणि दोन इंटरनल आणि दोन एक्सटर्नल हिंज असतील आणि त्याच्याशी संबंधित हार्डवेअर टेक्नॉलॉजीमध्ये सुधारणा केली जाईल, असे या अहवालात म्हटले आहे. सध्याच्या फोल्डेबल फोनच्या तुलनेत हा खूपच महाग असेल, असे म्हटले जात आहे. हुवावेच्या ट्रायफोल्ड फोन मेट एक्सटी अल्टिमेट डिझाइनची किंमत १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत १९ हजार ९९९ चीनी युआन (अंदाजे २,३५,९०० रुपये) पासून सुरू होते.

मोठा डिस्प्ले मिळण्याची शक्यता

सॅमसंगडिस्प्ले सॅमसंगच्या ट्रिपल फोल्ड फोनसाठी डिस्प्ले पॅनेल पुरवणार आहे. यात डावी बाजू उघडल्यावर १०.५ इंचाची स्क्रीन आणि उजवी बाजू उघडल्यावर १२.४ इंचाची स्क्रीन असू शकते. यात अंडर डिस्प्ले कॅमेरा नसेल असे म्हटले जात आहे. बाजारात सॅमसंग कंपनीचे अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. सॅमसंग हा आपल्या कॅमेऱ्यासाठी ओळखला जातो. गेल्या वर्षी बाजारात दाखल झालेल्या सॅमसंग एस २४ अल्ट्राने मोठी पसंती मिळवली.

Whats_app_banner