50 MP Front Camera Phones: बेस्ट फ्रंट कॅमेरा फोनच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकतेच सॅमसंग, विवो आणि मोटोरोला कंपनीचे स्मार्टफोन बाजारात दाखल झाले आहेत, ज्यात ग्राहकांना ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळत आहे. याशिवाय, या फोनमध्ये जबरदस्त रिअर कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे.
मोटोरोला एज ५० प्रो 5G ची किंमत फ्लिपकार्टवर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजसह ३५ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. तर, फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यात १३ मेगापिक्सल आणि ५० मेगापिक्सलच्या मुख्य लेन्ससह १० मेगापिक्सलची लेन्स मिळत आहे. फोनचा डिस्प्ले ६.७ इंचाचा आहे, जो १४४ हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ४५०० एमएएचची आहे, जी १२५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
अॅमेझॉन इंडियावर सॅमसंग गॅलेक्सी एम ५५एस 5G मध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला २५ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. सॅमसंगचा हा फोन ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सोबत येतो. फोनच्या बॅक पॅनेलवर एलईडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा पाहायला मिळतो. याशिवाय, कंपनी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो अँगल कॅमेरा देत आहे. फोनमध्ये कंपनी फुल एचडी+ रिझोल्यूशनसह ६.७ इंचाचा सुपर एमोलेड प्लस डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ५००० एमएएच ची आहे, जी ४५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
विवो व्ही ४० 5G ची किंमत अॅमेझॉन इंडियावर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजसह ३५ हजार ८० रुपये आहे. या फोनमध्ये कंपनी झेडईएसएसचा ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा आणि ५० मेगापिक्सलचा ओआयएस मेन लेन्स देण्यात आला आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये अल्ट्रास्लिम थ्रीडी कर्व्ड डिस्प्ले देखील मिळेल. फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ५५०० एमएएचची आहे, जी ८० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.