Samsung Smartphones: येत्या १७ तारखेला सॅमसंग धमाका करणार, अनेक फोन बाजारात उतरवणार!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Samsung Smartphones: येत्या १७ तारखेला सॅमसंग धमाका करणार, अनेक फोन बाजारात उतरवणार!

Samsung Smartphones: येत्या १७ तारखेला सॅमसंग धमाका करणार, अनेक फोन बाजारात उतरवणार!

Jan 03, 2024 12:12 PM IST

Samsung Upcoming Smartphones: येत्या १७ जानेवारीला सॅमसंग कंपनी त्यांचे नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

Samsung
Samsung

Upcoming Smartphones: सॅमसंगच्या नव्या फोनची प्रतिक्षा करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. कपंनीने त्यांच्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटची लॉन्च तारीख जाहीर केली आहे. येत्या १७ तारखेला हा इव्हेंट होईल. या इव्हेंटमध्ये कंपनी सॅमसंग गॅलेक्सी एस २४ सीरिजसह गॅलेक्सी एआय लॉन्च करणार आहे. सॅमसंग कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटचा लँडिंग पेज लाईव्ह झाले आहे,ज्यात नव्या फोनच्या प्री- रिजर्वेशनबद्दल माहिती देण्यात आली आहे.

कंपनीने भारतासाठी गॅलेक्सी एस २४ सीरिजचे प्री-रिझर्व्हेशन ऑफर्सची माहिती दिली आहे. ग्राहक अवघ्या १ हजार ९९९ रुपयांत गॅलेक्सी एस २४ सीरिजच आरक्षित करू शकतात. हे पैसे रिफंडेबल असतील. तसेच प्री-रिझर्व्ह करणाऱ्या ५ हजारांची अतिरिक्त सूट देण्यात येईल. याचबरोबर त्यांना सर्वात प्रथम फोन वितरित केले जातील.

नव्या फोनसोबत ग्राहकांना आकर्षक अशा अनेक ऑफर्स मिळणार आहेत. यामध्ये ग्राहकांना जुन्या फोनच्या बदल्यात मोठा एक्सचेंज बोनस मिळेल. याशिवाय, सॅमसंग स्टोअर अॅपद्वारे फोन प्री-आरक्षित केल्यास ग्राहकांना ५ हजारांचे वेलकम व्हाउचर आणि स्मार्ट क्लब मेंबरशिपमध्ये २ क्के लॉयल्टी पॉइंट्स देखील मिळतील. कंपनी बाय मोअर, सेव्ह मोअर प्रमोशन देखील करत आहे. यामध्ये युजर्सना दोन प्रोडक्ट्सच्या खरेदीवर ५ टक्के सूट दिली जात आहे.

लीक झालेल्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एस २४ आणि गॅलेक्सी एस २४ प्लस स्मार्टफोन Exynos 2400 आणि Snapdragon 8 Gen 3 चिपसेटसह येतील. हा प्रोसेसर फोनच्या मार्केटवर अवलंबून असेल. कंपनी सर्व मार्केटमध्ये Snapdragon 8 Gen 3 चिपसेटसह गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ऑफर करेल. कंपनीच्या फोनची नवीन मालिका Android 14 वर आधारित OneUI 61 वर काम करेल.

Whats_app_banner