सॅमसंग फोन वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! फोनला कॉम्प्युटर बनवणारे 'हे' अ‍ॅप होणार कायमचं बंद, वाचा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  सॅमसंग फोन वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! फोनला कॉम्प्युटर बनवणारे 'हे' अ‍ॅप होणार कायमचं बंद, वाचा

सॅमसंग फोन वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! फोनला कॉम्प्युटर बनवणारे 'हे' अ‍ॅप होणार कायमचं बंद, वाचा

Dec 02, 2024 09:36 AM IST

Samsung News : सॅमसंग स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. फोन वापरणाऱ्यांना फोनमधून डेस्कटॉप कॉम्प्युटरसारखा अनुभव देणारं अ‍ॅप बंद करण्यात येत आहे.

सॅमसंग फोन वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! फोनला कॉम्प्युटर बनवणारे 'हे' अ‍ॅप होणार कायमचं बंद, वाचा
सॅमसंग फोन वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! फोनला कॉम्प्युटर बनवणारे 'हे' अ‍ॅप होणार कायमचं बंद, वाचा

Samsung News : सॅमसंग स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. टेक ब्रँड सॅमसंगने वनयूआय ७ अपडेटशी संबंधित नवीन माहिती शेअर केली आहे. कंपनीने प्रीमियम स्मार्टफोनमध्ये दिलेले सॅमसंग डेक्स अ‍ॅप विंडोज प्लॅटफॉर्मसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  या अ‍ॅपमुळे  सॅमसंगच्या स्मार्टफोन डेस्कटॉप कॉम्प्युटर सारखा वापरता येत होता. या फोनला  एक्सटर्नल मॉनिटर, कीबोर्ड आणि माउस कनेक्ट करून युजर्स फोवर संगणकाचा अनुभव घेऊ शकत होते. मात्र, हे अ‍ॅप आता बंद करण्यात आलं आहे.   

सॅमसंगच्या अँड्रॉइड-आधारित सॉफ्टवेअर स्किन वनयूआय ७  शी संबंधित सातत्याने नवी माहिती समोर येत आहे. त्यात आता सॅमसंग यूके वेबसाइटवरून कंपनीने केलेल्या नव्या बदलाची माहिती समोर आली आहे.  सॅमसंग डेक्स पेजवर या बाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार  वनयूआय ७ अपडेट विंडोज ओएससाठी अ‍ॅपचा सपोर्ट बंद करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.  या सोबतच युजर्स आपला फोन पीसीशी कनेक्ट करण्यासाठी लिंक टू विंडोज फीचरचा वापर करू शकतात.

आता ‘या’ फीचरचा करता येणार वापर 

आतापर्यंत सॅमसंग डेक्स फीचर वापरणाऱ्या युजर्सना हे बदल कदाचित काळजी करण्याजोगे वाटत असतील मात्र,  युझर्सवर  या बदलाचा फारसा परिणाम होणार नाही. खरं तर सॅमसंगनेच युजर्सना बिल्ट-इन 'लिंक टू विंडोज' फीचरवर मायग्रेट करण्याचा सल्ला दिला आहे. हे नवे फीचर देखील आधीच्या अ‍ॅपसारखाच अनुभव व  कार्यक्षमता प्रदान करणार आहे. 'लिंक टू विंडोज' हे बिल्ट इन विंडोज ओएस फीचर असून सॅमसंग व्यतिरिक्त इतर स्मार्टफोनला देखील सपोर्ट करते.

फक्त विंडोज अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय 

विशेष म्हणजे केवळ विंडोज अ‍ॅप्स बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.  मॉनिटर आणि कीबोर्ड-माउस हार्डवेअर कनेक्ट केल्यानंतर डेक्स इतरांना डेस्कटॉपसारखा सेटअप वापरण्याच्या अनुभव देत होते. विंडोज अ‍ॅप वापरणाऱ्या युजर्ससाठी मात्र, आता हे फीचर बंद झाल्याने त्यांना अडचणी येऊ शकतात.  याव्यतिरिक्त सॅमसंग थर्ड पार्टी एज पॅनेलचा सपोर्ट देखील बंद केला जाणार आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना समान यूआय दिला जात होता. 

लेटेस्ट वनयूआय ७ अपडेटमध्ये अनेक बदल, अपडेटेड आयकॉन आणि खास फीचर्स देखील देण्यात येणार आहेत. यापूर्वी याचे काही स्क्रीनशॉट लीकमध्ये समोर आले होते. हे अपडेट कंपनीच्या पुढील फ्लॅगशिप सॅमसंग गॅलेक्सी एस २५ सीरिजमध्ये अपडेट केली जाण्याची शक्यता आहे.  

 

Whats_app_banner