स्लिमर डिझाइन आणि मोठ्या डिस्प्लेसह सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड स्पेशल एडिशन लॉन्च
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  स्लिमर डिझाइन आणि मोठ्या डिस्प्लेसह सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड स्पेशल एडिशन लॉन्च

स्लिमर डिझाइन आणि मोठ्या डिस्प्लेसह सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड स्पेशल एडिशन लॉन्च

Published Oct 24, 2024 07:23 PM IST

Samsung Galaxy Z Fold Special Edition: सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड स्पेशल एडिशन जागतिक बाजारात लॉन्च झाला आहे.

मसंग गॅलेक्सी झेड फोल्ड स्पेशल एडिशन लॉन्च
मसंग गॅलेक्सी झेड फोल्ड स्पेशल एडिशन लॉन्च (Samsung)

Samsung Galaxy Z Fold Special Edition Lauched: सॅमसंगने आपला बहुप्रितिक्षित फोल्डेबल स्मार्टफोन फोल्डेबल स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड स्पेशल एडिशन दक्षिण कोरियात लॉन्च केला. सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड स्पेशल एडिशन हा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ६ च्या तुलनेत अधिक स्लिमर डिझाइन, मोठा डिस्प्ले आणि अपग्रेडेड कॅमेऱ्यासह येतो. 

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड स्पेशल एडिशनमध्ये २१:९ आस्पेक्ट रेशियोसह ६.५ इंचाचा एलटीपीओ एमोलेड २ एक्स कव्हर डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले झेड फोल्ड ६ च्या  ६.३ इंच डिस्प्लेपेक्षा थोडा मोठा आहे. यात ८ इंचाचा क्यूएक्सजीए+ डायनॅमिक एमोलेड २ एक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही डिस्प्ले १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २६०० निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देतात. 

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड स्पेशल एडिशन १०.६ मिमी जाड आणि  २३६ ग्रॅम वजनाचा आहे, ज्यामुळे तो गॅलेक्सी झेड फोल्ड ६ पेक्षा १.५ मिमी स्लिम आणि ३ ग्रॅम हलका आहे. हा स्मार्टफोन झेड फॉल्फ ६ च्या ५.६ मिमी जाडीच्या तुलनेत ४.९ मिमी स्लिम आहे. त्यामुळे सॅमसंगने काही महत्त्वपूर्ण डिझाइन अपग्रेडचा समावेश केला आहे. नवीन फोल्डेबल कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 द्वारे संरक्षित आहे आणि धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी आयपी ४८ रेटिंग मिळाले आहे.

स्पेशल एडिशनमध्ये १६ जीबी रॅमसह त्याच  स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी झेड फोल्ड स्पेशल एडिशनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात २०० एमपीचा मुख्य कॅमेरा, १२ एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि १० एमपी टेलिफोटो कॅमेरा आहे. मुख्य कॅमेऱ्यात ५० मेगापिक्सेलवरून २०० मेगापिक्सेलपर्यंत अपग्रेड पाहायला मिळेल. यात ४ हजार ४०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड स्पेशल एडिशन: किंमत

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड स्पेशल एडिशन ब्लॅक शॅडोच्या सिंगल कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आले. हा स्मार्टफोन केवळ २५ ऑक्टोबरपासून दक्षिण कोरियाच्या बाजारात उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनच्या १६ जीबी + ५१२ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत अंदाजे १ लाख ७० हजार २९५ रुपये आहे.

Whats_app_banner