थेट ११ हजारांनी स्वस्त मिळतोय सॅमसंगच्या फ्लिप फोन, डिझाइन पाहून अनेकांना लागलंय वेड!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  थेट ११ हजारांनी स्वस्त मिळतोय सॅमसंगच्या फ्लिप फोन, डिझाइन पाहून अनेकांना लागलंय वेड!

थेट ११ हजारांनी स्वस्त मिळतोय सॅमसंगच्या फ्लिप फोन, डिझाइन पाहून अनेकांना लागलंय वेड!

Dec 30, 2024 06:02 PM IST

Samsung Galaxy Z Flip 6: सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६ फोनच्या खरेदीवर ग्राहकांना मोठी सवलत मिळत आहे. ११ हजारांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह फोनवर एक्स्चेंज बोनसही मिळत आहे.

थेट ११ हजारांनी स्वस्त मिळतोय सॅमसंगच्या फ्लिप फोन
थेट ११ हजारांनी स्वस्त मिळतोय सॅमसंगच्या फ्लिप फोन

Best Deal on Samsung Galaxy Z Flip 6: सॅमसंगच्या वेबसाईटवर तुमच्यासाठी एक दमदार डील आहे. या डीलमध्ये तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६ मूळ किंमतीपेक्षा खूप स्वस्त मिळत आहे. फोनच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत १ लाख ०९ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवर ११,००० रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे द्यावे लागतील. याशिवाय, कंपनी या फोनवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस देखील देत आहे. परंतु, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी अतिरिक्त सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६: डिस्प्ले

कंपनी या फोनमध्ये ६.७ इंचाचा डायनॅमिक एमोलेड २एक्स इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये देण्यात आलेला हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. गॅलेक्सी झेड फ्लिप ६ मध्ये ३.४ इंचाचा सुपर एमोलेड कव्हर डिस्प्ले देखील आहे. हा डिस्प्ले ६० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६: स्टोरेज

सॅमसंगचा हा फ्लिप फोन १२ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायात येतो. प्रोसेसर म्हणून कंपनी यात स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेट देत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६: कॅमेरा

फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा देत आहे. यासोबतच फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल कॅमेराही पाहायला मिळणार आहे. सेल्फीसाठी डिव्हाइसच्या इनर डिस्प्लेवर १० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जात आहे.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६: बॅटरी

फोनची बॅटरी ४००० एमएएच ची असून २५ वॉट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पाहायला मिळेल. हा फोन आयपी ४८ डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंगसह येतो.

सॅमसंग गॅलेक्सी रिंग २ भारतात लॉन्च

सॅमसंगने जुलै २०२४ मध्ये वियरेबल मार्केटमध्ये आपला वाटा वाढवण्यासाठी स्मार्ट रिंग सेगमेंटमध्ये प्रवेश केला होता. ग्लोबल मार्केटमध्ये गॅलेक्सी रिंग लॉन्च केल्यानंतर आता कंपनी आपला उत्तराधिकारी म्हणून गॅलेक्सी रिंग २ लॉन्च केली. मायस्मार्टप्राइसने दिलेल्या वृत्तानुसार, गॅलेक्सी रिंग २ चे सपोर्ट पेज कंपनीच्या अधिकृत यूके आणि स्वित्झर्लंड वेबसाइटवर दिसून आले आहे.

Whats_app_banner