सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने त्यांचे नवीन गॅलॅक्सी बड्स३, गॅलॅक्सी बड्स३ प्रो, गॅलॅक्सी वॉच७ आणि गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा स्मार्टवॉचेस् प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. गॅलॅक्सी वॉच७ आणि गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा सर्वांना एण्ड-टू-एण्ड वेलनेस अनुभव देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेल्या वीअरेबल्सच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत गॅलॅक्सी एआयची क्षमता पोहचवण्याचे काम करणार आहेत. नवीन व सर्वात शक्तिशाली डिवाईस गॅलॅक्सी वॉच अल्ट्रामध्ये अल्टिमेट इंटेलिजन्स व क्षमतांसह, काही फिटनेस मोड देखील डिझाईन करण्यात आले आहेत.
गॅलॅक्सी वॉच अल्ट्रामध्ये नवीन कुशन डिझाइन आहे, जी या घडाळ्याला संरक्षण तर देतेच. पण सोबतच त्याचा व्हिज्युअल लूक देखील स्टायलिश बनवते. या स्मार्टवॉचमध्ये टायटॅनियम ग्रेड ४ फ्रेम आणि १० एटीएम वॉटर रेसिस्टंस अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. समुद्रामध्ये पोहणे, अत्यंत प्रखर वातावरणात सायकल चालवणे अशा प्रगत फिटनेस अनुभवांदरम्यान हे गॅलॅक्सी वॉच धमाकेदार काम करणार आहे.
गॅलॅक्सी वॉचमध्ये क्विक बटन देखील देण्यात आले आहे. या बटणाद्वारे त्वरित वर्कआऊट्स सुरू करण्यासोबतच, त्यावर नियंत्रण ठेवू शकता आणि तुमच्या गरजांनुसार इतर वैशिष्ट्यांवर देखील देखरेख ठेवू शकता. तसेच, सुरक्षिततेसाठी इमर्जन्सी सायरन देखील कार्यान्वित करू शकता. वर्कआऊटनंतर गॅलॅक्सी वॉच अल्ट्रावरील वॉच फेसेसवर त्वरित आकडेवारी तपासू शकता. ३,००० नीट्सच्या ब्राइटनेससह गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा प्रखर सूर्यप्रकाशात देखील स्क्रिनवरील बाबी सुस्पष्टपणे दिसणार आहेत. लांबच्या प्रवासादरम्यान सतत कार्यरत राहण्यासाठी गॅलॅक्सी वॉच अल्ट्रामध्ये गॅलॅक्सी वॉच लाईन-अपमधील दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी आहे, जी पॉवर सेव्हिंगमध्ये जवळपास १०० तासांपर्यंत आणि एक्सरसाइज पॉवर सेव्हिंगमध्ये ४८ तासांपर्यंत कार्यरत राहते.
गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा ४७ मिमी आकारासह टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम व्हाइट आणि टायटॅनियम सिल्व्हर या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. गॅलॅक्सी वॉच अल्ट्रामध्ये ३ एनएम चिपसेट आहे. गॅलॅक्सी वॉच७ सह, तुम्ही १००हून अधिक वर्कआऊट्स अचूकपणे ट्रॅक करू शकता आणि तुमची ध्येये पूर्ण करण्यासाठी वर्कआऊट रूटिनसह विविध व्यायामांना एकत्र करत रूटिन्स तयार करू शकता. यात, तुमचा स्लीपिंग पॅटर्न तपासण्यासाठी नवीन प्रगत गॅलॅक्सी एआय अल्गोदिरम आहे. इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) आणि ब्लड प्रेशर (बीपी) मॉनिटरिंगसह हृदयाच्या आरोग्याबाबत सखोल माहिती मिळवता येणार आहे.
गॅलॅक्सी वॉच७ प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना ८००० रूपयांची मल्टी-बँक कॅशबॅक किंवा ८००० रूपयांचा अपग्रेड बोनस मिळणार आहे. तसेच, गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना १०००० रूपयांची मल्टी-बँक कॅशबॅक किंवा १०००० रूपयांचा अपग्रेड बोनस मिळेल.
Watch7 Watch7 40 mm BT 29999
Watch7 Watch7 40 mm LTE 33999
Watch7 Watch7 44 mm BT 32999
Watch7 Watch7 44 mm LTE 36999
Watch Ultra 59999
Buds3 14999
Buds3 Pro 19999