Galaxy S24 series Price and Specifications: सॅमसंगने बुधवारी रात्री उशिरा गॅलेक्सी अनपॅक्ड कार्यक्रमात त्यांची बहुप्रतीक्षित गॅलेक्सी एस २४ सीरिज लॉन्च आहे. ज्यात गॅलेक्सी एस २४ (Galaxy S24), गॅलेक्सी एस २४ प्लस (Galaxy S24+), गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा (Galaxy S24 Ultra) अशा तीन धमाकेदार स्मार्टफोनचा समावेश आहे. गॅलेक्सी एस २४ या सीरिजमधील बेस व्हेरिएंट आहे. तर, गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा टॉप व्हेरिएंट आहे. या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत ७९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर, टॉप व्हेरिएंटसाठी १ लाख ५९ हजार ९९९ रुपये मोजावे लागतील. या तिन्ही स्मार्टफोनच्या प्री- बुकींगला सुरुवात झाली असून येत्या ३१ जानेवारीपासून हे स्मार्टफोन विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असतील. महत्त्वाचे म्हणजे, गॅलेक्सी एस २४ सीरिज भारतातील नोएडा येथील फॅक्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चर करण्यात आले आहेत.
एचडीएफसीच्या ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर भरघोस सूट दिली जात आहे. दरम्यान, ५ हजाराच्या प्लॅट डिस्काउंटनंतर १२ हजार रुपयापर्यंतचे एक्स्चेंज ऑफर दिली जात आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. याशिवाय, सॅमसंग फायनान्स+ वर ११ महिने विनाशुल्क इएमआय पर्याय मिळत आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ स्मार्टफोन Amber Yellow, Cobalt Violet आणि Onyx Black अशा तीन रंगात बाजारात उपलब्ध असेल. तर, सॅमसंग गॅलेक्सी एस २४ प्लस हा Cobalt Violet आणि Onyx Black अशा दोन रंगात खरेदी करता येईल. तसेच गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा हा टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम व्हायोलेट, टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम ग्रे अशा ४ रंगामध्ये सादर करण्यात आला आहे.
८ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोरेज- ७९ हजार ९९९ रुपये.
८ जीबी रॅम/५१२ जीबी स्टोरेज- ८९ हजार ९९९ रुपये.
१२ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोरेज- ८६ हजार ९९९ रुपये.
१२ जीबी रॅम/५१२ जीबी स्टोरेज- ८७ हजार ९९९ रुपये.
१२ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोरेज- १ लाख १६ हजार ९९९ रुपये.
१२ जीबी रॅम/५१२ जीबी स्टोरेज- १ लाख १७ हजार ९९९ रुपये.
१२ जीबी रॅम/१ टीबी स्टोरेज- १ लाख ५९ हजार ९९९ रुपये.