Samsung Galaxy S24 New Price: सॅमसंग गॅलेक्सी एस २५ सीरिज लॉन्च होताच कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी एस २४ च्या किंमतीत कपात केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २४ फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कंपनीने सॅमसंगने गॅलेक्सी एस २४ ची किंमत १० हजार रुपयांपर्यंत कमी केली आहे. हा फोन गॅलेक्सी एआय फीचर्ससह येणारा फ्लॅगशिप फोन आहे. हा फोन आपल्या कॅमेऱ्यामुळे चर्चेत आला होता.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ च्या बेस व्हेरियंटची किंमत १० हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ६४ हजार ९९९ रुपये इतकी आहे. किंमत कपातीपूर्वी फोनची किंमत ७३ हजार ९९९ रुपये होती.
या फोनच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ९ हजारांनी कमी करण्यात आली आहे. यापूर्वी हा फोन ७८ हजार ९९९ रुपयांना विकला जात होता. मात्र, आता हा फोन ७० हजार ९९९ रुपयांत लिस्ट करण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ च्या ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटच्या किंमतीत ७ हजार रुपयांनी कपात करण्यात आली. हा फोन ८२ हजार ९९९ रुपयांत विकला जात आहे. यापूर्वी या फोनची किंमत ८८ हजार ९९९ रुपये इतकी होती.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ 5G मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, एचडीआर १०+ सपोर्ट आणि २६०० निट्स पीक ब्राइटनेससह ६.२ इंचाचा एलटीपीओ एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ प्रोटेक्टेड आहे.
गॅलेक्सी एस २४ 5G मध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर आहे. या प्रीमियम स्मार्टफोनमध्ये ८ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज मिळते.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, १० मेगापिक्सलचा सेकंडरी आणि १२ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
फोनला पॉवर देण्यासाठी यात ४००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी २५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
संबंधित बातम्या