Samsung Galaxy S24 FE: एआय फीचर्स असलेला सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोन लॉन्च, प्री-ऑर्डरवर ६००० रुपयांची सूट-samsung galaxy s24 fe with bigger screen and 7 android updates now available from rs 59999 ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Samsung Galaxy S24 FE: एआय फीचर्स असलेला सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोन लॉन्च, प्री-ऑर्डरवर ६००० रुपयांची सूट

Samsung Galaxy S24 FE: एआय फीचर्स असलेला सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोन लॉन्च, प्री-ऑर्डरवर ६००० रुपयांची सूट

Sep 27, 2024 07:30 PM IST

Samsung Galaxy S24 FE Launched: सॅमसंगने गॅलेक्सी एस २४ एफई भारतात अधिकृतपणे लॉन्च केला आहे. सॅमसंगचा हा फोन अनेक एआय फीचर्सने सुसज्ज आहे.

सॅमसंगने गॅलेक्सी एस २४ लॉन्च!
सॅमसंगने गॅलेक्सी एस २४ लॉन्च!

Samsung Galaxy S24 FE Launched: सॅमसंग गॅलेक्सी एस २४ एफई बद्दल गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक अफवा पसवल्या जात होत्या. अखेर हा फोन भारतात अधिकृतपणे लॉन्च करण्यात आला आहे. सॅमसंगचा हा फोन अनेक एआय फीचर्सने सुसज्ज आहे, ज्यामुळे तुमचे दैनंदिन काम सोपे होईल. फोनमध्ये एक्सीनॉस २४०० ई चिपसेट देण्यात आला असून ४ हजार ७०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा आणि १० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये सर्कल टू सर्च आणि लाइव्ह ट्रान्सलेटसारख्या गॅलेक्सी एआय फीचर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे.

भारतात सॅमसंग गॅलेक्सी एस २४ एफईची किंमत ६० हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. फोनच्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत ५९ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम + २५६ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ६५ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन ३ ऑक्टोबरपासून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन ब्लू, ग्रॅफाइट आणि मिंट अशा रंगात खरेदीसाठी उपलब्ध असेल.

हा हँडसेट सॅमसंग इंडियाच्या वेबसाइट आणि निवडक रिटेल स्टोअर्सद्वारे देशात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे. प्री-बुकिंग ऑफर अंतर्गत ग्राहक सॅमसंग गॅलेक्सी एस २४ एफईचे २५६ जीबी व्हेरिएंट ५९ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. म्हणजेच तुम्हाला ६००० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. प्री- बुकिंगदरम्यान ग्राहकांना ५०० रुपयांचे सॅमसंग केअर+ पॅकेज देखील मिळू शकते. हे पॅकेज ४ हजार ७९९ रुपयांमध्ये येते. फोनसोबत ग्राहकांना १२ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्यायाचा ही फायदा मिळू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी एस २४ एफई: डिस्प्ले

या स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाची एफएचडी + एमोलेड स्क्रीन आहे, जी १.९ मिमी बेजल्स आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस + प्रोटेक्शनसह येतो. फोनमध्ये ग्लास बॅक, अ‍ॅल्युमिनियम फ्रेम आहे. फोनला धूळ आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी ६८ आयपी ६८ रेटेड देण्यात आले. 

सॅमसंग गॅलेक्सी एस २४ एफई: बॅटरी

या फोनमध्ये ४७०० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे, जी २५ वॅट फास्ट चार्जिंग तसेच वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते.

सॅमसंग गॅलेक्सी एस २४ एफई: कॅमेरा

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात नवीन ५० एमपी रिअर कॅमेरा, १२ एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ८ एमपी टेलिफोटो कॅमेरा आहे. यात १० मेगापिक्सेलचा नवा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन अॅडव्हान्स्ड डिजिटल इमेज स्टॅबिलायझेशन (व्हीडीआयएस) आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझर (ओआयएस) सोबत येतो.

सॅमसंग गॅलेक्सी एस २४ एफई: कनेक्टिव्हिटी

एफई सीरिज ग्लोबल एक्सीनॉस २४०० ई एसओसी प्रोसेसरसह येते. हा फोन अँड्रॉइड १४ वर चालतो आणि वर वन यूआय ६.१ आहे. यात ७ वर्षांचे अँड्रॉइड अपडेट आणि ७ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट मिळेल. यात जनरेटिव्ह एडिट, पोर्ट्रेट स्टुडिओ, एडिट सल्लेक्शन आणि इन्स्टंट स्लो-मो फीचर्स, तसेच सर्कल टू सर्च विथ गुगल, इंटरप्रेटर, लाइव्ह ट्रान्सलेट आणि एस २४ सीरिजमधील नोट असिस्ट देखील आहेत.

Whats_app_banner
विभाग