Samsung Galaxy S24 Price: लेटेस्ट फीचर्स असलेला नवा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. अॅमेझॉनवर अनेक उच्च दर्जाचे स्मार्टफोनवर डिस्काउंट आणि बँक ऑफर्ससह उपलब्ध आहेत. यात सॅमसंग गॅलेक्सी एस २४चाही समावेश आहे, जो हाय-रिझोल्यूशन कॅमेरा, प्रभावी डिस्प्ले आणि लेटेस्ट एडिटिंग फीचर्ससाठी ओळखला जातो. याशिवाय, ग्राहकांना एआय फीचर्सचाही अनुभव घेता येणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ स्मार्टफोन २५ टक्के डिस्काउंटनंतर ५६ हजार ४५९ रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोनची मूळ किंमत ७४ हजार ९९९ रुपये आहे. बँक आणि एक्स्चेंज ऑफर्सचा वापर करून ग्राहक आणखी कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकतात. एचडीएफसी च्या १२ महिने किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट कार्डचा वापर करून किमान ७ हजार ५०० रुपयांच्या खरेदी मूल्यावर १००० रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो. ज्यांना चांगला कॅमेरा आणि मेमरी स्टोरेज असलेला स्मार्टफोन हवा आहे, त्यांच्यासाठी हा फोन उत्तम पर्याय आहे.
या स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.२ इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यात प्रोटेक्शनसाठी गोरिल्ला ग्लास कव्हरिंग देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी तसेच वायरलेस चार्जिंग सपोर्टसह सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ बेस्ड वन यूआय ६.१ ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि १० मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे . याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ च्या १२८ जीबी, २५६ स्टोरेज आणि ५१२ जीबी स्टोरेज अशा असंख्य स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन कोबाल्ट व्हायोलेट, ऑनिक्स ब्लॅक, अंबर येलो आणि मार्बल ग्रे कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ स्मार्टफोनमध्ये सर्कल टू सर्च, ब्राउझिंग असिस्ट, रिअल टाइम ट्रान्सलेशनसाठी कॉल असिस्ट, नोट असिस्ट आणि जनरेटिव्ह फोटो एडिटिंग सारखे लेटेस्ट गॅलेक्सी एआय फीचर्स आहेत.