सॅमसंग गॅलेक्सी एस २३ हा स्मार्टफोन वाचवणार मालकाचा जीव; अपघात झाल्यास पोलीस, रुग्णालयाला करणार अलर्ट
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  सॅमसंग गॅलेक्सी एस २३ हा स्मार्टफोन वाचवणार मालकाचा जीव; अपघात झाल्यास पोलीस, रुग्णालयाला करणार अलर्ट

सॅमसंग गॅलेक्सी एस २३ हा स्मार्टफोन वाचवणार मालकाचा जीव; अपघात झाल्यास पोलीस, रुग्णालयाला करणार अलर्ट

Dec 31, 2024 06:09 PM IST

Car Crash Detection : सॅमसंग गॅलेक्सी एस २३ डिव्हाइसमध्ये कार क्रॅश डिटेक्शन फीचर मिळेल, अशी माहिती एका नव्या रिपोर्टमध्ये समोर आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस २३ वाचवणार मालकाचा जीव; अपघात झाल्यास पोलीस, रुग्णालयाला करणार अलर्ट
सॅमसंग गॅलेक्सी एस २३ वाचवणार मालकाचा जीव; अपघात झाल्यास पोलीस, रुग्णालयाला करणार अलर्ट

Samsung Galaxy S23 5G: दक्षिण कोरियन टेक कंपनी सॅमसंग आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लाइनअप २२ जानेवारीरोजी गॅलेक्सी अनपॅक्ड २०२५ इव्हेंटमध्ये लाँच करू शकते. नव्या गॅलेक्सी एस २५ सीरिजमधील सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा ५ जी मध्ये अनेक अपग्रेड्स देण्यात येणार असून नव्या रिपोर्टवर विश्वास ठेवल्यास यात खास क्रॅश डिटेक्शन फीचर असणार आहे. अ‍ॅपल आयफोन आणि गुगल पिक्सल डिव्हाइसेसमध्ये मिळणाऱ्या फीचर्सप्रमाणेच अपघात झाल्यास आपत्कालीन सेवेला तत्काळ माहिती दिली जाते.

सॅमसंग स्मार्टफोनमध्ये कार क्रॅश डिटेक्शन फीचर देण्यासाठी कंपनी व्हर्च्युअल कम्पोझिट सेन्सरचा वापर करू शकते, असे या अहवालात समोर आले आहे. या इंटिग्रेशनमुळे युजर्सना अपघातासारख्या परिस्थितीत अतिरिक्त सुरक्षेचा फायदा मिळणार आहे. अपघातात अनेकदा जखमी झालेल्या लोकांना वेळत उपचार न मिळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र, या फीचरमुळे अपघात झाल्यानंतर फोनमधून आपोआप जवळचे पोलीस ठाणे आणि रुग्णालयाला फोन किंवा मेसेज जाईल.

नवीन क्रॅश डिटेक्शन फीचर सध्या अ‍ॅक्टिव्ह नाही आणि ते लेटेस्ट वनयूआय बिल्डचा भाग बनवण्यात आलेले नाही, असे समोर आले आहे. रिपोर्टनुसार, यापूर्वी सॅमसंगच्या जुन्या सॉफ्टवेअर वनयूआय ५.१.१ मध्ये या फीचरचा समावेश करण्यात आला होता. गॅलेक्सी एस २४ सीरिज आणि सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये मोकामोबाइल नावाची छुपी अ‍ॅप सिस्टीम असून त्याच्या कोडमध्ये कार क्रॅश डिटेक्शनच्या व्हर्च्युअल सेन्सर स्टार्ट आणि स्टॉपशी संबंधित संदर्भांचा समावेश असल्याचे समोर आले होते.

नवीन फीचर यूआयचा भाग बनवण्यात आले नसले तरी कंपनी बऱ्याच काळापासून यावर काम करत होती. शेवटी, याला गॅलेक्सी एस २५ अल्ट्राचा भाग बनविले जाऊ शकते. त्यानंतर हे फीचर इतर डिव्हाइसमध्येही समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. कंपनीने गॅलेक्सी एस २४ सीरिजचा भाग बनवलेले गॅलेक्सी एआय फीचर्स नंतर इतर डिव्हाइसेस आणि मागील फ्लॅगशिप मॉडेल्समध्ये देखील इंटिग्रेट केले आहेत. आयफोन १४ सीरिजनंतर अ‍ॅपल २०२२ पासून क्रॅश डिटेक्शन फीचर्स देत आहे. गॅलेक्सी एस २५ सीरिजचे नवे फोन ४फेब्रुवारीला त्या युजर्ससाठी उपलब्ध होऊ शकतात जे ते आगाऊ बुकिंग करतील.

 

Whats_app_banner