Samsung Galaxy S23: सॅमसंग गॅलेक्सी एस २३ मोठ्या डिस्काऊंटसह अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध!-samsung galaxy s23 5g now available with a big price cut on amazon ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Samsung Galaxy S23: सॅमसंग गॅलेक्सी एस २३ मोठ्या डिस्काऊंटसह अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध!

Samsung Galaxy S23: सॅमसंग गॅलेक्सी एस २३ मोठ्या डिस्काऊंटसह अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध!

Mar 08, 2024 12:24 PM IST

Amazon Sale: सॅमसंग गॅलेक्सी एस २३ 5G च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली. ज्यामुळे हा ग्राहकांना हा फोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली.

Samsung Galaxy S23 5G
Samsung Galaxy S23 5G (samsung)

Samsung Galaxy S23: अ‍ॅमेझॉनवर सॅमसंग गॅलेक्सी एस २३ 5G च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली. हा स्मार्टफोन २८ टक्के डिस्काउंटसह ६४ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध झाला आहे.  या फोनची मूळ किंमत ८९ हजार ९९९ रुपये आहे. प्रीमियम डिव्हाइसमध्ये अपग्रेड करण्याची एक चांगली संधी आहे.

या स्मार्टफोनच्या खरेदीवर निवडक क्रेडिट कार्ड आणि एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डवर ९ हजार रुपयांपर्यंत अनेक बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. याशिवाय, ग्राहक कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय सोयीस्कर ईएमआय पेमेंट पर्याय निवडू शकतात. निवडक क्रेडिट कार्ड, एचडीएफसी बँक डेबिट कार्ड आणि अ‍ॅमेझॉन पे लेटरवर ५ हजार १०२ रुपयांपर्यंत बचत करू शकतात. पार्टनर ऑफर्सवापरकर्त्यांना जीएसटी इनव्हॉइस मिळविण्यास आणि व्यवसाय खरेदीवर २८ टक्केपर्यंत बचत करता येऊ शकते.

Xiaomi 14 Series: वायरलेस चार्जिंग, दमदार कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले; शाओमी १४ सीरिज भारतात लॉन्च

सॅमसंग गॅलेक्सी एस २३ मध्ये ग्राहकांना प्रभावी फीचर्स मिळतात. सॅमसंग गॅलेक्सी एस २३ मध्ये ग्राहकांना ६.१ इंचाचा डिस्प्ले मिळत आहे, ज्याचा रिफ्रेश दर १२०Hz आहे. व्हॅनिला व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येतो. फोनच्या मागच्या बाजूला तीन कॅमेरे आहेत. व्हॅनिला व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येतो. Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर फोनमध्ये उपलब्ध आहे. 

Nothing Phone 2a: फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर, नथिंग फोन २ ए खरेदी करा मिड- रेंज स्मार्टफोनच्या किंमतीत!

फोनच्या मागच्या बाजुला तीन कॅमेरा देण्यात आला. ज्यात प्राथमिक लेन्स ५० मेगापिक्सलची आहे. दुसरी लेन्स १० मेगापिक्सल आणि टेलीफोटो लेन्स १२ मेगापिक्सलची आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये १२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २३ मध्ये ३ हजार ९०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे.

 

Whats_app_banner
विभाग