Massive Discount on Samsung Galaxy S23 5G: स्मार्टफोनप्रेमी किंवा नवीन फोन खरेदी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक रोमांचक संधी आहे. अॅमेझॉन विविध फीचर लोडेड मोबाइल फोन आणि डिव्हाइसेसवर पॉकेट-फ्रेंडली किंमतीत मोठी सूट आणि डील्स देत आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २३ 5G यापैकी एक स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये ५० एमपी हाय-रिझोल्यूशन कॅमेरा मिळत आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २३ 5G हा एक स्मार्टफोन आहे, जो त्याच्या कार्यक्षम कॅमेरा आणि उच्च कार्यक्षमतेसाठी ओळखला जातो.
अॅमेझॉन वेबसाइटवर सॅमसंग गॅलेक्सी एस २३ 5G च्या खरेदीवर चक्क ४५ टक्के सूट म्हणजेच ५२ हजार ९०० रुपयांना उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत ९५ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक आणि एक्स्चेंज ऑफर्सचा लाभ मिळत आहे, ज्यामुळे ग्राहक हा फोन अर्ध्या किंमतीत खरेदी करू शकतात. अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून ग्राहकांना १००० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल.
सॅमसंग गॅलेक्सी एस २३ ५जी मध्ये ६.१ इंचाचा एमोलेड डिस्प्ले आणि स्लॅंडर स्क्रीन आहे. यात १०८० बाय २३४० पिक्सल रिझोल्यूशन आणि १७५० निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ च्या कव्हरसह सुसज्ज आहे आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट प्रदान करतो.
सॅमसंग गॅलेक्सी एस २३ 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि १० मेगापिक्सलचा ओआयएस कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
गॅलेक्सी एस २३ 5Gमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ प्रोसेसर आहे. सॅमसंगच्या हाय एंड फ्लॅगशिपमध्ये फोटो क्लिक करण्यासाठी आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी उत्तम कॅमेरा क्वालिटी आहे. स्मार्टफोन वापरताना युजर्स ३० फ्रेम प्रति सेकंद या वेगाने 8K व्हिडिओ कॅप्चर करू शकतात. स्मार्टफोनमध्ये ३ हजार ९०० एमएएच क्षमतेची बॅटरीदेण्यातआली आहे, जी दिवसभर चालू शकते.