Samsung Galaxy M55s launched: सॅमसंगने आपला नवीन मिड-रेंज स्मार्टफोन गॅलेक्सी एम ५५ एस लाँच केला आहे. या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सिस्टीम आहे जी ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशनला सपोर्ट करते. नवीन गॅलेक्सी एम ५५ एस हा गेल्या वर्षी लाँच झालेल्या गॅलेक्सी एम ५५ फोनचा उत्तराधिकारी आहे. चला तर मग या सॅमसंग फोनची किंमत आणि सर्व वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊयात.
८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ एस च्या व्हेरिएंटची किंमत १९ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. हा फोन ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. परंतु, कंपनीने अद्याप याची किंमत काय असेल, याचा खुलासा केलेला नाही. हा स्मार्टफोन कोरल ग्रीन आणि थंडर ब्लॅक अशा दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे.
गॅलेक्सी एम ५५ एस फोन २६ सप्टेंबरपासून अॅमेझॉन, सॅमसंगचे ऑनलाइन स्टोअर आणि सॅमसंग एक्सक्लुझिव्ह रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध होईल. लाँच ऑफरमध्ये एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास २,००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. परंतु, डिस्काउंट मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध असेल.
सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले आहे जो १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि १,००० निट्सच्या ब्राइटनेससह येतो. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ७ जेन १ चिपसेट आहे, जो अॅड्रेनो ६४४ जीपीयूसह जोडला गेला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ एस मध्ये १२ जीबीपर्यंत रॅम आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येईल. अँड्रॉइड १४ वर आधारित हा फोन वनयूआय ६.१ वर चालतो. सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ एस मध्ये स्टीरिओ स्पीकर्स आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
फोनच्या मागील बाजूस सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ एस मध्ये ओआयएस सपोर्टसह ५० एमपी चा मुख्य कॅमेरा, ८ एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा आणि २ एमपी मॅक्रो कॅमेरा आहे. रियर कॅमेरा 30 एफपीएसवर 4के व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. यात ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये कंपनीने ड्युअल रेकॉर्डिंग दिले आहे, जेणेकरून तुम्ही एकाच वेळी फ्रंट आणि रिअर दोन्ही कॅमेऱ्यातून व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता, जो ब्लॉगर्ससाठी चांगला पर्याय आहे. फोनमध्ये नाईटोग्राफीचा पर्याय देखील आहे जो आपल्याला कमी प्रकाशात फोटो आणि व्हिडिओ घेण्यास मदत करतो.
सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ एस मध्ये ४५ वॅट फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगचा नवा स्मार्टफोन चांगल्या वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.2 आणि वाय-फाय 6 सपोर्ट करतो.