मराठी बातम्या  /  बिझनेस  /  लॉचिन्गपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ स्मार्टफोनमधील फीचर्स लीक!

लॉचिन्गपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ स्मार्टफोनमधील फीचर्स लीक!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 29, 2024 09:30 PM IST

सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ 5G मध्ये मिळणाऱ्या फीचर्सबाबत महत्त्वाची माहिती लीक झाली आहे.

लॉचिन्गपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ स्मार्टफोनमधील फीचर्स लीक झाले आहेत.
लॉचिन्गपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ स्मार्टफोनमधील फीचर्स लीक झाले आहेत. (Samsung)

सॅमसंग गॅलेक्सी एम ५५  हा सॅमसंगचा नवीनतम स्मार्टफोन आहे, ज्याने ऑनलाइन प्रसिद्धी मिळवली आहे, त्याच्या आगामी लाँचिंगपूर्वीच सोशल मीडियावर अधिक चर्चा रंगल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर लीक झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ बाबत अनेक फीचर्स लीक झाले आहेत.

एमएसपॉवरयुजरच्या रिपोर्टनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ मध्ये ग्राहकांना आकर्षक लूक पाहायला मिळत आहे.  या फोनमध्ये फ्रंट कॅमेऱ्यामध्ये होल- पंच स्लॉट उघड झाला आहे. हा स्मार्टफोन काळा आणि हलक्या हिरव्या रंगात बाजारात रंगामध्ये बाजारात दाखल झाला आहे. हा फोन १८० ग्रॅम वजनाचा आहे. 

बॅक पॅनेलवर, सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ मध्ये एलईडी फ्लॅश युनिटसह तीन स्वतंत्र वर्तुळाकार स्लॉटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा युनिट असण्याची शक्यता आहे. सहज प्रवेशासाठी पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर्स उजव्या काठावर स्थित आहेत.

Flipkart News : फ्लिपकार्टवरून ग्राहकाने मागवला २२ हजाराचा स्मार्टफोन, मात्र बॉक्समध्ये मिळाले चक्क दगड

सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ७ जेन १ प्रोसेसर आणि १२ जीबी पर्यंत रॅम असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये १ टीबीपर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकते.  हा फोन १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज अशा दोन स्टोरेज पर्यायांसह बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.  हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ आधारित वन यूआयवर चालण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ग्राहकांना ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे.

Xiaomi First EV : टेस्ला मॉडेल ३ पेक्षा कमी किंमतीत शाओमीची पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च!

स्मार्टफोनमध्ये ४५ वॉट वायर्ड सुपर फास्ट चार्जिंग २.० सुसंगततेसह ५ हजार  एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली. सॅमसंग नॉक्स व्हॉल्टसह ऑन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सुरक्षा फीचर्समध्ये केले जाऊ शकते, ज्यामुळे गोपनीयता आणि सुरक्षितता वाढते. या आकर्षक स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह, सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ त्याच्या अपेक्षित लाँचिंगनंतर मिड-रेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी सज्ज आहे.

WhatsApp channel

विभाग