Samsung Galaxy M55 5G And Samsung Galaxy M15 5G: स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगची एम सीरिज येत्या ८ एप्रिल २०२४ भारतीय बाजारात दाखल होत आहे. या सीरिजमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ 5G आणि सॅमसंग गॅलेक्सी एम १५ 5G अशा दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. या फोनमध्ये ग्राहकांना अनेक सेगमेंट लीडिंग फीचर्स देण्यात आले आहेत. हे दोन्ही फोन ८ एप्रिलला रात्री १२ वाजता भारतात लॉन्च केले जातील.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ 5G मध्ये १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड प्लस डिस्प्ले असेल, जो १००० निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल. गॅलेक्सी एम ५५ 5G मध्ये ५० मेगापिक्सलचा (ओआयएस) नो शेक कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात इमेज क्लिपर आणि ऑब्जेक्ट इरेजर सारख्या एआय फीचर्सचा समावेश असेल. सॅमसंगच्या फ्लॅगशिप डिव्हाइसमधून नाइटोग्राफी फीचरही मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ग्राहकांना या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. याशिवाय, या फोनमध्ये नॉक्स सिक्युरिटी आणि टॅप-टू-पे सारख्या सॅमसंग वॉलेटसारखे फीचर्स मिळतील. याचबरोबर फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे, जी ४५ वॅट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन लाइट ग्रीन आणि डेनिम ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये बाजारात उपलब्ध होईल.
सॅमसंग गॅलेक्सी एम १५ 5G मध्ये नॉक्स सिक्युरिटीसह ६.५ इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. सॅमसंगचे म्हणणे आहे की, गॅलेक्सी एम १५ 5G मध्ये ६ हजार एमएएचची बॅटरी असेल, जी 2 दिवसांपर्यंत टिकेल. हा फोन सेलेस्टाइन ब्लू, स्टोन ग्रे आणि ब्लू टोपाझ अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ५ 5G ची किंमत ९९ हजार ९९९ रुपये आहे. ज्यात ग्राहकांना ६.७ इंचाचा डिस्प्लेसह ड्युअल कॅमेरा सेटअप मिळत आहे. प्रायमरी कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळत आहे. अॅमेझॉनवर या स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सूट मिळत आहे.