अवघ्या ८ हजारांत सॅमसंग गॅलेक्सी एम ०५ भारतात लॉन्च; फोनमध्ये मिळणारे फीचर्स पाहून भुवया उंचावतील!-samsung galaxy m05 budget smartphone with 50mp camera launched at rs 7 999 check specs features and more ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अवघ्या ८ हजारांत सॅमसंग गॅलेक्सी एम ०५ भारतात लॉन्च; फोनमध्ये मिळणारे फीचर्स पाहून भुवया उंचावतील!

अवघ्या ८ हजारांत सॅमसंग गॅलेक्सी एम ०५ भारतात लॉन्च; फोनमध्ये मिळणारे फीचर्स पाहून भुवया उंचावतील!

Sep 12, 2024 09:12 PM IST

Samsung Galaxy M05 Launched: सॅमसंग कंपनीचा बजेट स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एम ०५ भारतात लॉन्च झाला असून या फोनमध्ये ग्राहकांना दमदार फीचर्स मिळत आहेत.

 सॅमसंग गॅलेक्सी एम ०५ भारतात लॉन्च
सॅमसंग गॅलेक्सी एम ०५ भारतात लॉन्च (Samsung)

Samsung Galaxy M05 Launched In India: सॅमसंगने गॅलेक्सी एम ०५ भारतात लॉन्च केला आहे. हा फोन सॅमसंग गॅलेक्सी एम ०४ ची जागा घेईल. सॅमसंग गॅलेक्सी एम ०५ मध्ये मीडियाटेक हेलियो जी ८५ चिपसेटसह ५००० एमएएच बॅटरी आणि ५० एमपी कॅमेरा आहे देण्यात आल आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा फोन अवघ्या ८ हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम ०५ मध्ये देण्यात आलेल्या फीचर्सबाबत जाणून घेऊयात.

सॅमसंग गॅलेक्सी एम 0५: डिस्प्ले

सॅमसंग गॅलेक्सी एम ०५ मध्ये ६.७ इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60 हर्ट्झ आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी ८५ प्रोसेसर देण्यात आला असून, १००० मेगाहर्ट्झपर्यंत एआरएम माली-जी५२ २ईईएमसी २ जीपीयू देण्यात आला आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी एम 0५: स्टोरेज

फोनमध्ये ४ जीबी LPDDR4X रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ बेस्ड वनयूआय कोर ६.० वर चालतो. 

सॅमसंग गॅलेक्सी एम 0५: स्टोरेज

या स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून २५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम 0५: कनेक्टिव्हिटी

कनेक्टिव्हिटीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम ०५ ड्युअल 4G व्हीओएलटीई, २.४ गीगाहर्ट्झ आणि ५ गीगाहर्ट्झ दोन्ही बँडवर वाय-फाय ८०२.११ एसी, ब्लूटूथ ५.३, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी सपोर्ट करतो. सिक्युरिटी फीचर्समध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर चा समावेश आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम 0५: कॅमेरा

फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. एफ/१.८ अपर्चरमुळे कमी प्रकाशाच्या वातावरणातही सविस्तर छायाचित्रे टिपण्याच्या फोनच्या क्षमतेवर कंपनीने भर दिला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम 05: किंमत आणि उपलब्धता

गॅलेक्सी एम ०५ ची किंमत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. ग्राहक अ‍ॅमेझॉन, सॅमसंगची अधिकृत वेबसाइट आणि इतर रिटेल भागीदारांद्वारे डिव्हाइस खरेदी करू शकतात.

Whats_app_banner
विभाग