Samsung Galaxy Book 4 Series: भारतात सॅमसंग गॅलेक्सी बूक ४ सीरिजच्या प्री-बुकिंगला सुरुवात-samsung galaxy book 4 series pre bookings begin in india all you need to know ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Samsung Galaxy Book 4 Series: भारतात सॅमसंग गॅलेक्सी बूक ४ सीरिजच्या प्री-बुकिंगला सुरुवात

Samsung Galaxy Book 4 Series: भारतात सॅमसंग गॅलेक्सी बूक ४ सीरिजच्या प्री-बुकिंगला सुरुवात

Feb 12, 2024 06:28 PM IST

Samsung Galaxy: गॅलेक्सी बूक ४ प्रो मध्ये १४ इंच किंवा १६ इंचाचा अमोलेड डिस्प्ले, इंटेल कोर अल्ट्रा प्रोसेसर, ३२ जीबी पर्यंत रॅम आणि १ टीबीपर्यंत स्टोरेज असू शकते.

Samsung Galaxy Book 4 is expected to launch in India later this month.
Samsung Galaxy Book 4 is expected to launch in India later this month.

Samsung Galaxy Book 4 series pre- bookings begin in India: भारतात सॅमसंगने गॅलेक्सी बूक ४ सीरिजच्या प्री-बुकिंग सुरुवात केली. गॅलेक्सी बुक ४ सीरिजमध्ये गॅलेक्सी बूक ४ प्रो, गॅलेक्सी बुक ४ प्रो ३६० आणि गॅलेक्सी बूक ४ अल्ट्रा मॉडेलचा समावेश असू शकतो. गॅलेक्सी बुक ४ सीरिज भारतात लाँच होण्याआधी डिसेंबरमध्ये दक्षिण कोरियात लाँच करण्यात आली.

गॅलेक्सी बुक ४ सीरिज सॅमसंग. कॉम, सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आणि निवडक रिटेल आणि ऑनलाइन आउटलेट्सवर १ हजार ९९९ रुपयांसह प्री- बूक करता येणार आहे.  प्री- ऑर्डर करणाऱ्या ग्राहक गॅलेक्सी बूक ४ च्या खरेदीवर ५ हजारांचे डिस्काऊंट दिले जाणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी बुक ४ 

प्रो व्हर्जनमध्ये १४ इंच किंवा १६ इंचाचा एमोलेड डिस्प्ले असू शकतो, ज्याचे रिझोल्यूशन १८००/२८८० पिक्सल, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ४०० निट्स पीक ब्राइटनेस असू शकते. प्रो व्हेरियंटमध्ये इंटेल कोर अल्ट्रा ५ किंवा इंटेल कोर अल्ट्रा ७ चिपसेटसह इंटेल आर्क ग्राफिक्स आणि ३२ जीबी पर्यंत LPDDR5X रॅम आणि १ टीबीपर्यंत एसएसडी स्टोरेज सपोर्ट असू शकतो.

गॅलेक्सी बूक प्रो आवृत्तीमध्ये ६३ डब्ल्यूएच बॅटरी असू शकते. तर, १६ इंच आवृत्तीमध्ये ७६ डब्ल्यूएच बॅटरी असू शकते. या दोन्हीमध्ये ६५ वॉट चार्जिंगसाठी समर्थन असू शकते. प्रो मॉडेल वायफाय ६ ई आणि ब्लूटूथ ५.३ सह सर्व आवश्यक कनेक्टिव्हिटी पर्यायांसह येईल आणि डिस्प्ले आकारानुसार त्याचे वजन सुमारे १.२३ किंवा १.५६ किलो असू शकते.

भारतातील ‘या’ विमान कंपनीकडे पगार द्यायलाही पैसे नाही; १४०० कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढणार

दरम्यान, हाय-एंड गॅलेक्सी बुक ४ अल्ट्रामध्ये २८८०× १८०० पिक्सल रिझोल्यूशन आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसाठी सपोर्ट सह १६ इंचाचा एमोलेड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. नोटबुकमध्ये इंटेल कोर अल्ट्रा ९ प्रोसेसर किंवा अल्ट्रा ७ चिपसेट सह एनव्हीआयडीआयए जीफोर्स आरटीएक्स ४०७० किंवा एनव्हीआयडीआयए जीफोर्स आरटीएक्स ४०५० जीपीयू असेल. गॅलेक्सी बूक ४ अल्ट्रामध्ये ६४ जीबी पर्यंत LPDDR5X रॅम आणि २ टीबीपर्यंत एसएसडी स्टोरेज असू शकते.

Whats_app_banner