Samsung Galaxy A series: सॅमसंग गॅलेक्सी ए ५५, सॅमसंग गॅलेक्सी ए३५ भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Samsung Galaxy A series: सॅमसंग गॅलेक्सी ए ५५, सॅमसंग गॅलेक्सी ए३५ भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!

Samsung Galaxy A series: सॅमसंग गॅलेक्सी ए ५५, सॅमसंग गॅलेक्सी ए३५ भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!

Updated Mar 15, 2024 05:42 PM IST

सॅमसंग गॅलेक्सी ए५५ आणि सॅमसंग गॅलेक्सी ए३५ हे दोन्ही स्मार्टफोन भारतात लॉन्च झाले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल जाणून घेऊयात.

Samsung Galaxy A55 and Samsung Galaxy A35 price details have been unveiled in India.
Samsung Galaxy A55 and Samsung Galaxy A35 price details have been unveiled in India. (Samsung)

Samsung Galaxy A Series: सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी ए सीरिजमध्ये दोन नव्या स्मार्टफोनची भर घातली आहे. या आठवड्याच्या सुरूवातीस कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी ए ५५ 5G आणि सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ 5G हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले. परंतु, लॉन्चिंगदरम्यान या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.  

गॅलेक्सी ए ५५ 5G ऑगरी आइसब्लू, ऑसम लिलॅक आणि ऑसम नेव्ही या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ 5G केवळ ऑसम आइसब्लू आणि ऑसम या दोन रंगात लॉन्च करण्यात आला आहे. 

 

सॅमसंग गॅलेक्सी ए ५५: स्टोरेज आणि किंमत 

सॅमसंग गॅलेक्सी ए ५५ हा स्मार्टफोन ८जीबी + १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी + २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी + २५६ जीबी स्टोरेज अशा तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. ८जीबी + १२८ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत ३६ हजार ९९९ रुपये इतकी आहे. ८ जीबी + २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी + २५६ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे ३९ हजार ९९९ रुपये आणि ४२ हजार ९९९ रुपये इतकी आहे.

 

सॅमसंग गॅलेक्सी ए ३५: स्टोरेज आणि किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ हा स्मार्टफोन ८ जीबी+१२८ जीबी आणि ८ जीबी+२५६ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च झाला आहे. या दोन्ही व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे २७ हजार ९९९ रुपये आणि ३० हजार ९९९ रुपये आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ च्या खरेदीदारांना १ हजार ४९९ रुपयांचे फ्री कार्ड स्लॉट केस आणि ३००० रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काउंट मिळेल. त्याचप्रमाणे सॅमसंग गॅलेक्सी ए ५५ च्या खरेदीदारांना १ हजार ९९९ रुपये किमतीचे कॉम्प्लिमेंटरी सिलिकॉन केस आणि त्याच बँक डिस्काऊंटचा आनंद मिळेल.

OnePlus: भारतात धुमाकूळ घालायला येतोय वनप्लसचा 'हा' फोन; २५ हजारांत मिळणार धमाकेदार फीचर्स!

 

सॅमसंग गॅलेक्सी ए ५५ 5G फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी ए ५५ मध्ये १२० हर्ट्झपर्यंतच्या रिफ्रेश रेटसह ६.६ इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले आहे, जो इमर्सिव्ह व्ह्यूइंग अनुभव प्रदान करतो. गोरिल्ला ग्लास व्हिक्टस द्वारे संरक्षित आहे. या डिव्हाइसमध्ये मजबूत एक्सीनॉस १४८० प्रोसेसर आहे, जो ८ जीबी किंवा १२ जीबी रॅम पर्यायांसह १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह अखंडपणे इंटिग्रेटेड आहे. लेटेस्ट अँड्रॉइड १४ वर आधारित सॅमसंगच्या वन यूआय ६.१ वर चालणाऱ्या या फोनमध्ये नॉक्स ३.१ प्रोटेक्शनसह सिक्युरिटी महत्त्वाची आहे. फोटोग्राफीप्रेमींना ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळत आहे, ज्यात ५० मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेन्स आणि ५ एमपी मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ एमपी फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे.

Xiaomi vs Samsung: शाओमी १४ अल्ट्रा की सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा, कोणता फोन खरेदी करावा? वाचा

 

सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ 5G फीचर्स

दरम्यान, सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ देखील त्याच्या फुल-एचडी + एमोलेड डिस्प्ले आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. फोटोग्राफी ग्राहकांना ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात ५० मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सल मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेन्स आणि ५ मेगापिक्सल मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे.  तर, सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ मध्ये ५००० एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली.

Whats_app_banner