Samsung Galaxy A55 : तगडे फीचर्स असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए५५ 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Samsung Galaxy A55 : तगडे फीचर्स असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए५५ 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत!

Samsung Galaxy A55 : तगडे फीचर्स असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए५५ 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत!

Nov 05, 2024 06:26 PM IST

Samsung Galaxy A55 Price Cut: सॅमसंग गॅलेक्सी ए५५ 5G कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ६ हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. याशिवाय, या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना कॅशबॅक ऑफर देखील मिळत आहे.

तगडे फीचर्स असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए५५ 5G स्मार्टफोन झाला स्वस्त
तगडे फीचर्स असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए५५ 5G स्मार्टफोन झाला स्वस्त

Samsung Galaxy A55 Price Drop: सॅमसंग कंपनीचा फोन घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर सॅमसंग गॅलेक्सी ए ५५ 5G मूळ किंमतीपेक्षा स्वस्त मिळत आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए५५ 5G १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत मोठ्या सवलतीसह खरेदी करू शकता. फोनच्या या व्हेरियंटची किंमत ४५ हजार ९९९ रुपये आहे. ग्राहक हा फोन ६ हजार रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. ही सवलत फक्त निवडक बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांसाठी उपलब्ध आहे.

हा फोन खरेदी करण्यासाठी सॅमसंग अ‍ॅक्सिस बँकेचे कार्ड वापरत असाल तर तुम्हाला १० टक्के कॅशबॅक मिळेल. कंपनी या फोनवर जबरदस्त एक्स्चेंज बोनस देखील देत आहे.  महत्त्वाचे म्हणजे, या फोनवर मिळणारी एक्स्चेंज ऑफर ग्राहकांचा जुना फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. अधिक माहितीसाठी इच्छुक ग्राहकांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. 

सॅमसंग गॅलेक्सी ए५५ 5G: डिस्प्ले

सॅमसंग गॅलेक्सी ए५५ 5G मध्ये २३४०×१०८० पिक्सल रिझोल्यूशनसह ६.६ इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड इन्फिनिटी-ओ एचडीआर डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी या फोनमध्ये गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ देखील ऑफर करत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए५५ 5G: स्टोरेज

सॅमसंग गॅलेक्सी ए५५ 5G मध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायात येतो. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये एक्सीनॉस १४८० चिपसेट पाहायला मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए५५ 5G: कॅमेरा

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए५५ 5G मध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये ५० मेगापिक्सलचा मेन लेन्ससह १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी कंपनी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए५५ 5G: बॅटरी

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी २५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएसबद्दल बोलायचे झाले तर, फोन अँड्रॉइड १४ वर आधारित वनयूआय ६.१ वर काम करतो.

Whats_app_banner