Samsung Galaxy A16: ५० मेगापिक्सेल कॅमेरा आणि ६ वर्षांचे ओएस अपडेट; लवकरच बाजारात येतोय सॅमसंग गॅलेक्सी ए १६!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Samsung Galaxy A16: ५० मेगापिक्सेल कॅमेरा आणि ६ वर्षांचे ओएस अपडेट; लवकरच बाजारात येतोय सॅमसंग गॅलेक्सी ए १६!

Samsung Galaxy A16: ५० मेगापिक्सेल कॅमेरा आणि ६ वर्षांचे ओएस अपडेट; लवकरच बाजारात येतोय सॅमसंग गॅलेक्सी ए १६!

Oct 07, 2024 03:07 PM IST

Samsung Galaxy A16 5G Launching Date: सॅमसंग लवकरच आपला नवा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए १६ लाँच करणार आहे. या फोनची खासियत म्हणजे यात ६ वर्षांचे ओएस आणि ६ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट मिळणार आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए १६ या महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता
सॅमसंग गॅलेक्सी ए १६ या महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता

Upcoming Smartphones: सॅमसंग लवकरच आपला नवा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए १६ लॉन्च करणार आहे.  टेक आउटलुकच्या रिपोर्टनुसार, सॅमसंग गॅलेक्सी ए १६ 5G भारतात ऑक्टोबरच्या मध्यात लॉन्च होणार आहे. सॅमसंगकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु जर फोन या महिन्यात लॉन्च झाला तर आपल्याला लवकरच काही टीझर पाहायला मिळू शकतात.

सॅमसंग गॅलेक्सी ए १६ हा स्मार्टफोन नुकताच अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर स्पॉट करण्यात आला आहे. या फोनची खासियत म्हणजे, यात ६ वर्षांचे ओएस आणि ६ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. 

लीक झालेल्या माहितीनुसार, फोनच्या रियर पॅनेलमध्ये ए सीरिजस्मार्टफोनप्रमाणेच तीन कॅमेरा सेन्सर असतील आणि सेन्सरच्या शेजारी एलईडी फ्लॅश असेल. रियर पॅनेलवर प्रीमियम ग्लास डिझाइनसह येते. फ्रंटमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन स्लिम डिझाइनसह येणार आहे. हा फोन लाइट ग्रीन, ब्लू, ब्लॅक आणि गोल्ड कलर व्हेरियंटमध्ये येऊ शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए१६: डिस्प्ले

सॅमसंग गॅलेक्सी ए १६ 5G मध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा एफएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले असू शकतो. हा स्मार्टफोन एक्सीनॉस १३३० आणि मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० चिपसेटसह येऊ शकतो. 

सॅमसंग गॅलेक्सी ए१६: कॅमेरा

सॅमसंग फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असू शकतो. सेल्फीसाठी यात १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए१६: बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

सॅमसंग गॅलेक्सी ए १६ 5G मध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि २५ वॉट फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देण्यात आला आहे. फोनला धूळ आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी गॅलेक्सी ए १६ 5G साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि आयपी 54 रेटिंगसह येण्याची अपेक्षा करू शकतो. गॅलेक्सी ए १६ 5G मध्ये बेस्ट ओएस/सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत. या फोनमध्ये ६ ओएस अपडेट आणि ६ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत.  वरील फीचर्स लीक झालेल्या माहितीनुसार आहेत. याबद्दल कंपनीकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. यामुळे या फोनमध्ये ग्राहकांना नेमकी कोणती फीचर्स मिळणार आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल.

Whats_app_banner