Samsung Galaxy A14 Price and Specifications: फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल येत्या २६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह तगडे फीचर्स असलेले स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. भारतात सर्वाधिक विक्री झालेला सॅमसंग गॅलेक्सी ए १४ वरही ग्राहकांना मोठी सूट मिळणार आहे. ग्राहकांना हा फोन अवघ्या ९ हजार ९९९ रुपयांत घरी घेऊन जाता येणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस २३ सीरिज लॉन्चिंगपूर्वी कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी ए १४ भारतात लॉन्च केला. हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन आहे. एक्झिनॉस १३३० प्रोसेसर येणारा हा फोन डार्क रेड, लाइट ग्रीन आणि ब्लॅक या तीन नव्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन गेल्यावर्षी ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोरेज, ६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम/ १२८ जीबी स्टोरेज अशा तीन व्हेरिएंटसह भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला. हे तिन्ही फोन अनुक्रमे १६ हजार ९९९ रुपये, १८ हजार ९९९ रुपये आणि २० हजार ९९९ रुपयांच्या मूळ किंमतीसह लॉन्च करण्यात आले होते. मात्र, आता फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल अंतर्गत ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोन अवघ्या ९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए १४ 5G मध्ये ९० हर्ट्झपर्यंतच्या रिफ्रेश रेटसह ६.६ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे.सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यात चार वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स आणि दोन ओएस अपग्रेड्स देण्यात आले आहेत.
फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी ए १४ 5G मध्ये डेप्थ आणि मॅक्रो लेन्ससह ५० एमपी ट्रिपल लेन्स रिअर कॅमेरा सेटअप आणि १३ एमपी सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत चांगला कॅमेरा असलेला फोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
कंपनीने या फोनमध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए १४ मध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेली मोठी बॅटरी दिली आहे, जी दोन दिवसांपर्यंत चालेल.
सध्या हा फोन सॅमसंग एक्सक्लुझिव्ह आणि पार्टनर स्टोअर्स, कंपनीची अधिकृत बेवसाइट आणि इतर ऑनलाइन प्लेयर्सवर उपलब्ध आहे. परंतु, हा फोन स्वस्तात खरेदी करण्यासाठी ग्राहकांना फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलची वाट पाहावी लागेल.