अवघ्या १० हजारांत ५० मेगापिक्सलचा कॅमेरा, दमदार बॅटरी आणि बरेच काही; सॅमसंगचा नवा फोन बाजारात!-samsung galaxy a06 silently launched in india ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अवघ्या १० हजारांत ५० मेगापिक्सलचा कॅमेरा, दमदार बॅटरी आणि बरेच काही; सॅमसंगचा नवा फोन बाजारात!

अवघ्या १० हजारांत ५० मेगापिक्सलचा कॅमेरा, दमदार बॅटरी आणि बरेच काही; सॅमसंगचा नवा फोन बाजारात!

Sep 03, 2024 06:42 PM IST

Samsung Galaxy A06 Launched: सॅमसंगचा नवा बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी ए०६ भारतीय बाजारात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा, ५००० एमएएच क्षमता असलेली बॅटरीसह बरेच फीचर्स मिळत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए०६ भारतात लॉन्च
सॅमसंग गॅलेक्सी ए०६ भारतात लॉन्च

Samsung Galaxy A06 Launched in India: सॅमसंगने आपला नवीन गॅलेक्सी ए सीरिजमधील स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए०६ आज भारतात लॉन्च केला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे. याआधी हा स्मार्टफोन जागतिक बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. अवघ्या १० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनमध्ये ४जी एलटीई कनेक्टिव्हिटी, ड्युअल कॅमेरा, पॉवरफुल प्रोसेसर आणि ५००० एमएएच बॅटरीसह बरेच काही फीचर्स मिळत आहेत. कमी किंमतीत अधिक फीचर्सच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए०६ हा स्मार्टफोन लाईट ब्लू, ब्लॅक आणि गोल्ड अशा तीन रंगात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस व्हर्टिकल टेक्सचर डिझाइन आहे. सॅमसंगच्या या फोनच्या बेस व्हेरियंटची किंमत ९ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. गॅलेक्सी ए०६ स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंट किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. तर, ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ११ हजार ४९९ रुपये आहे.

ई- स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध

गॅलेक्सी ए सीरिजचा हा लेटेस्ट स्मार्टफोन सध्या सॅमसंग इंडिया ई-स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. येत्या काही दिवसांत हे प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध होणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए०६: डिस्प्ले आणि कॅमेरा

सॅमसंग गॅलेक्सी ए०६ मध्ये एचडी+ रिझोल्यूशन आणि ६० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा आयपीएस एलसीडी पॅनेल आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए०६ मध्ये मीडियाटेक हेलियो जी८५ प्रोसेसरसह ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.8 अपर्चरसह 50 एमपी प्रायमरी कॅमेरा आणि 2 एमपी सेकंडरी कॅमेरा आहे. फोनच्या फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए०६: कनेक्टिव्हिटी

हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ वर आधारित वन यूआय ६.१ वर चालतो. हा फोन दोन ओएस अपडेट आणि तीन वर्षांच्या सिक्युरिटी पॅच अपडेटसह येतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये २५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,००० एमएएचची बॅटरी मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G एलटीई, वाय-फाय ८०२.११ बी/#NAME?/ एन/एसी, ब्लूटूथ व्ही ५.३, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. हा फोन सॅमसंग नॉक्स, साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस अनलॉक आणि ३.५ एमएम ऑडिओ जॅकसह येतो.

विभाग