Smartphones Under 15000: सॅमसंग कंपनीचा बजेट स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी ए ०५ एस स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी भारतीय बाजारात लॉन्च झाला होता. हा फोन ४ जीबी आणि ६ जीबी रॅमसह सादर करण्यात आला होता. ४ जीबी रॅम आणि ६ जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोनच्या किंमतीत अनुक्रमे १००० आणि २००० रुपयांची कपात करण्यात आली.
सॅमसंग गॅलेक्सी ए ०५ एस स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम असलेला स्मार्टफोन ११ हजार ४९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. दुसरीकडे ६ जीबी रॅम असलेला स्मार्टफोन २ हजारांच्या कपातीनंतर १२ हजार ९९९ रुपयांत घरी नेता येणार आहे. हा स्मार्टफोन लाइट ग्रीन, लाइट वॉयलेट आणि ब्लॅक अशा तीन रंगात उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए ०५ एस मध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. याशिवाय, फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ग्राहकांना १३ मेगापिक्लचा कॅमेरा मिळत आहे. फोन ४ जीबी रॅम आणि ६ जीबी रॅम अशा दोन व्हेरिएंटसह लॉन्च करण्यात आला होता. सॅमसंग गॅलेक्सी ए ०५ एसमध्ये ग्राहकांना ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे, जी २५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवस बॅटरी बॅकअप देऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे.