मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Salary Hike 2024: नोकरदारांना खुशखबर, यंदा पगारात होणार भरघोस वाढ, किती वाढणार तुमची सॅलरी?

Salary Hike 2024: नोकरदारांना खुशखबर, यंदा पगारात होणार भरघोस वाढ, किती वाढणार तुमची सॅलरी?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 28, 2024 05:47 PM IST

Salary Hike 2024 : खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. कंपन्या यावर्षी १० टक्के पगार वाढ करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Salary Hike 2024
Salary Hike 2024

Salary Hike in 2024 : देशात खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एकीकडे अनेक कंपन्यांमध्ये नियमितपणे कर्मचारी कपात  (Layoffs 2024) केली जात आहे. त्यानुळे लोकांच्या मनात नोकरी गमावण्याची भीती आहे. दरम्यान, वेतनवृद्धीच्या या काळात कर्मचाऱ्यांच्या मनात पगारवाढीबद्दलही अनेक प्रश्न आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक वृत्त आहे. भारतात कंपन्यांकडून या वर्षी कर्मचाऱ्यांच्या वेतनात (Employees Salary Hike) सरासरी १० टक्के वृद्धि केली जाण्याची शक्यता आहे. वर्ष २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगारवाढीचा दर ९.५ टक्के होता. मंगळवारी जारी केलेल्या  एका सर्व्हेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 

सर्वेक्षणात म्हटले गेले आहे की, सर्वात अधिक वेतनवृद्धी (Salary Increments 2024) चा लाभ ऑटोमोबाइल, मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजीनिअरिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळेल. 

१४७४ कंपन्यांमधील २१ लाख कर्मचाऱ्यांचा डेटा जमा केला -

कन्सल्टसी फर्म मर्सरने मंगळवार सर्वेचे आकडे जारी केले. मिळालेल्या माहितीनुसार मर्सर संस्थेने मे ते ऑगस्ट २०२३ दरम्यान १४७४ कंपन्यांमधील २१ लाख कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली होती. यामध्ये वेगवेगळ्या सेक्टरमधील सॅलरी ट्रेंड्सवर फोकस केला आहे. त्याचबरोबर सर्व्हे मध्ये म्हटले आहे की, भारतात सरासरी वेतनवृद्धि  २०२४ मध्ये १० टक्के राहण्याची शक्यता आहे. जी २०२३ मध्ये ९.५ टक्के वृद्धीसह टॉपवर होती. 

त्याचबरोबर सर्वेक्षणात समोर आले आहे की, भारतात स्वेच्छेने नोकरी सोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. २०२२ मध्ये ही संख्या हळू-हळू वाढून १३.५ टक्के झाली आहे. जी २०२१ मध्ये १२.१ होती.

WhatsApp channel

विभाग