IPO Listing News In Marathi : साई लाइफ सायन्सेसच्या आयपीओची शेअर बाजारात दणदणीत सुरुवात झाली आहे. बीएसईवर (BSE) साई लाइफ सायन्सेसचा शेअर १११ रुपये म्हणजेच २०.२ टक्के प्रीमियमसह ६६० रुपयांवर सूचीबद्ध झाला आहे. तर, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (NSE) हा शेअर १०१ रुपये म्हणजेच १८.३ टक्के प्रीमियमसह ६५० रुपयांवर लिस्ट झाला आहे.
साई लाइफ सायन्सेस कंपनीचा आयपीओ ११ डिसेंबर २०२४ रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि १३ डिसेंबरपर्यंत खुला राहिला. शेअरची आयपीओ किंमत ५४९ रुपये होती. या तुलनेत कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. लिस्टिंगनंतर बीएसईवर कंपनीचा शेअर १५ टक्क्यांहून अधिक वाढून ७६३.१५ रुपयांवर पोहोचला आहे. तर एनएसईवर कंपनीचा शेअर १७ टक्क्यांहून अधिक तेजीसह ७६३.१५ रुपयांवर व्यवहार करत आहे. इश्यू प्राइसच्या तुलनेत शेअरमध्ये ३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आयपीओच्या माध्यमातून ३०४२.६२ कोटी रुपये उभारण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे.
साई लाइफ सायन्सेसचा आयपीओ एकूण १०.२७ पट सब्सक्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा १.३९ पट सब्सक्राइब झाला होता. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीत हा आयपीओ ४.९९ पट सबस्क्राइब झाला होता. पात्र संस्थात्मक खरेदीदार श्रेणीत २९.७८ पट सब्सक्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी एक लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी अर्ज करू शकत होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये २७ शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४,८२३ रुपयांची गुंतवणूक करावी लागली. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ४०.४८ टक्के होता, तो आता ३५.१ टक्क्यांवर आला आहे.
संबंधित बातम्या